रेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी 

रेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी 

पुणे  - रेल्वेच्या गाड्यांतून प्रवाशांच्या बॅगा, दागिने, पैसे चोरीस जाण्याच्या घटना नेहमीच घडतात; पण लांब पल्ल्याच्या वातानुकूल (एसी) पुणे-मुंबईतून सुटणाऱ्या गाड्यांतून प्रवाशांनीच रेल्वेचे दोन कोटी 32 लाख रुपयांचे बेडशीट, ब्लॅंकेट, टॉवेल आणि उशाच्या खोळी 18 महिन्यांत लंपास केल्या आहेत. प्रवाशांच्या या उचलेगिरीमुळे रेल्वे प्रशासनापुढे डोकेदुखी निर्माण झाली आहे. 

लांब पल्ल्याच्या "एसी' गाड्यांतून रेल्वेकडून प्रवाशांना बेडशीट, ब्लॅंकेट, टॉवेल, उशा पुरविल्या जातात. अनेक गाड्यांमध्ये त्यासाठी भाडेही आकारले जाते; परंतु प्रवास संपल्यावर त्या वस्तू परत करण्याऐवजी काही प्रवासी त्या लंपास करीत असल्याचे दिसून आले आहे. दिलेल्या वस्तू परत घेण्यासाठी ऍटेंडंट असतात; परंतु प्रत्येक वस्तूची तपासणी करणे त्यांना शक्‍य होत नाही. त्याचा गैरफायदा काही प्रवाशांकडून घेतला जातो. त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा मध्य रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहे, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रेल्वे अधिकाधिक सुविधा प्रवाशांना देण्याचा प्रयत्न करीत आहे; परंतु रेल्वेच्या बोगीतील वस्तूंची मोडतोड करण्याच्याही घटना घडत आहेत. प्रवाशांनी त्याबाबत भान राखावे, असे आवाहनही त्यांनी केले. 2017-18 या आर्थिक वर्षात एक कोटी 37 लाखांच्या; तर गेल्या सहा महिन्यांत 95 लाखांच्या वस्तू चोरीस गेल्याचे त्यांनी सांगितले. 

गेल्या 18 महिन्यांतील चोऱ्या 
बेडशीट - 21,285 
टॉवेल - 33,100 
ब्लॅंकेट - 1,874 
उशा - 2,331 
उशाच्या खोळी - 18, 516 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com