...आणि मला ब्रह्मांड आठवले

बाजीराव रस्ता - पावसात गुरुवारी दुपारी दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ पडलेले झाड.
बाजीराव रस्ता - पावसात गुरुवारी दुपारी दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ पडलेले झाड.

पुणे - कडकड करत ते भलं मोठं झाड रस्त्यावर कोसळलं. काही क्षणाचा उशीर आमच्या जिवावर बेतला असता. पडलेल्या झाडाकडे बघून माझ्या डोळ्यांसमोर ब्रह्मांड उभं राहिलं... किशोर जगताप सांगत होते. बोलताना आवाज कापरा झाला होता. त्यांची नजर फक्त एकटक आपल्या तीन वर्षांच्या पूर्वाकडे होती...

पीठगिरण चालविणारे जगताप ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘गुरुवारी दुपारी शहरात अचानक पावसाचे थेंब पडू लागले. काही कळायच्या आत पावसाचा जोर वाढला. प्रभात चित्रपटगृहापासून बाजीराव रस्ता ओलांडून जाईपर्यंत कपडे ओलेचिंब झाले. तेथे असलेल्या रिक्षात सुरवातीला वयोवृद्ध आईला बसविले.

पूर्वाला रिक्षात ठेवले. तिच्या पाठोपाठ पत्नी आणि मी रिक्षात बसलो. प्रभात चित्रपटगृह ते बाजीराव रस्त्यावरील दक्षिणमुखी मारुती मंदिरापर्यंत एक मिनीटदेखील लागला नसेल. भरपावसात रिक्षातून दक्षिणमुखी मारुती मंदिर ओलांडले आणि इतक्‍यात कडाडकडकड असा आवाज करत ते झाड रस्त्यावर पडलं. रिक्षावाल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला घेतली. मागे वळून पाहतो तर त्या झाडाच्या खाली पार्क केलेली दुचाकी अडकली होती. ते दृश्‍य बघताच भरपावसात अंग घामाघुम कसं होतं, याचा अनुभव आला.’’

यानंतर तातडीने अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन पडलेले झाड कापून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

काही क्षणांचा उशीर आमच्या जिवावर बेतला असता. या रिक्षात माझी पूर्वा होती. तिचं काय झालं असतं, या कल्पनेनेच माझ्या डोळ्यांसमोर अवघं ब्रह्मांड उभं राहिलं.
- किशोर जगताप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com