राज्यात पावसाचा जोर ओसरला

Rain
Rain

पुणे - राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी (ता. 18) ओसरला. मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाच्या काही सरी पडल्या; तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. पुढील चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात रविवार आणि सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. मंगळवारी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. मात्र, बुधवारी राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र होते. कोयना, लोणावळा, वळवण अशा घाटमाथ्यावर पावसाच्या सरींनी दिवसभर हजेरी लावली.

राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्‍या सरी पडत आहेत. विदर्भातही पावसाचा जोर ओसरणार असून, मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

यामुळे तीव्रता कमी
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनला बळकटी मिळाल्याने गेले काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टी झाली. मात्र, कमी दाब क्षेत्र जमिनीवर आल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे.

पुण्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
पुण्यात पावसाच्या एक दोन सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शहरात 1 जूनपासून 303.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यादरम्यान पुण्यात सरासरी 243.2 मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी आतापर्यंत सरासरीपेक्षा 60.2 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com