राज ठाकरे यांचा शुक्रवारी "रोड शो' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पुणे -महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शुक्रवारी (ता. 10) "रोड शो' आणि 16 फेब्रुवारी रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या "रोड शो'चा मार्ग आणि सभेचे ठिकाण अद्याप निश्‍चित करण्यात आलेले नाही, असे पक्षातर्फे सांगण्यात आले. 

मनसेतर्फे 126 जागांवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत. विद्यमान नगरसेवकांपैकी फक्त निम्मेच नगरसेवक यंदाची निवडणूक मनसेतर्फे लढवत आहेत. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या पक्षांतरामुळे आणि सक्षम उमेदवारांच्या अभावी यंदाची निवडणूक मनसेच्या दृष्टीने कठीण मानली जात आहे. त्यामुळे शोधून-शोधून उभ्या केलेल्या काही जणांसह पक्षाच्या अन्य अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांचे "कार्ड' प्रभावीपणे वापरणे हे मनसेसाठी महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या प्रभागनिहाय सभा, रॅली आणि "रोड शो'चे नियोजन पक्षाने केले आहे. 

Web Title: raj thackeray raod show