पिंपरीत राज ठाकरे गरजणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

पिंपरी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पिंपरी-चिंचवडमध्ये उभारी देण्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे विधान परिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर शहरात मेळावा घेणार आहेत. त्यासाठी शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ठाकरे यांच्या मुंबईतील "कृष्णकुंज' या निवासस्थानी भेट घेतली. 

पिंपरी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पिंपरी-चिंचवडमध्ये उभारी देण्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे विधान परिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर शहरात मेळावा घेणार आहेत. त्यासाठी शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ठाकरे यांच्या मुंबईतील "कृष्णकुंज' या निवासस्थानी भेट घेतली. 

शहराध्यक्ष सचिन चिखले, हेमंत डांगे, अंकुश तापकीर आदी पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेतली. चिखले यांनी शहरातील पक्षाच्या गेल्या दीड वर्षातील कामकाजाची माहिती ठाकरे यांच्यासमोर ठेवली. शहर मनसेमध्ये सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. पक्षाचे दोन नगरसेवक पक्षातून बाहेर पडण्याच्या पवित्र्यात आहेत. पक्षाची शहरातील स्थिती दोलायमान असल्याने ठाकरे यांनी शहरात लक्ष घातल्यास पक्षाला नवसंजीवनी मिळण्यास मदतच होणार आहे. 

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अन्य पक्षांतील काही इच्छुक कार्यकर्त्यांसह मनसेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यात त्यांचा पक्षप्रवेश करून घेण्याचे नियोजित आहे. ठाकरे यांच्या मेळाव्याची तारीख येत्या दोन दिवसांत निश्‍चित होईल, असे चिखले यांनी सांगितले. 

मनसेमध्ये नवीन पदाधिकारी आणि उमेदवार काम करण्यास इच्छुक आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा शहरात मेळावा झाल्यास कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारणार आहे. 

- सचिन चिखले, शहराध्यक्ष

पुणे

पुणे - गणेशोत्सवात बेकायदा मांडव, कमानी त्यासाठी बेकायदा खड्डे खोदलेल्या गणेश मंडळांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी...

02.12 AM

पुणे -शासनाने रिक्षा परवाने खुले केल्यानंतरही त्यातील अडचणी काही केल्या दूर होण्यास तयार नाहीत. आता परिवहन विभाग आणि राज्य परिवहन...

02.12 AM

पुणे -पुणे पोलिसांच्या विरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. आयोगाच्या पत्रव्यवहारांबाबत...

02.09 AM