rajendra
rajendra

बारामती तालुक्यातील शिर्सुफळच्या उपसरपंचपदी राजेंद्र आटोळे 

शिर्सुफळ (ता.बारामती) - येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र चंदर आटोळे यांची निवड झाली.

सरपंच आप्पासाहेब आटोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच निवड प्रक्रियेमध्ये निर्धारित वेळेत राजेंद्र आटोळे, विश्वास आटोळे व दादाराम आटोळे यांचे अर्ज दाखल झाले. यापैकी विश्वास आटोळे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर झालेल्या मतदान प्रक्रियेवेळी दादाराम आटोळे यांनीही राजेंद्र आटोळे यांना आपला पाठिंबा जाहिर केला.

यामुळे फक्त औपचारिक पणे हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये राजेंद्र आटोळे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार महादेव भोसले यांनी जाहिर केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन गाव कामगार तलाठी विनोद धापटे, व ग्रामसेवक दत्तात्रय धावडे यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com