जगाला खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेबांच्या विचाराची गरज आहे. याच विचारातून मंगळवार पेठेत निलेश आल्हाट व रीना आल्हाट यांचे गेली अनेक वर्षे समाजाभिमुख कार्य चालू ठेवली आहे.
कॅन्टोन्मेंट - जगाला खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेबांच्या (Dr Babasaheb Ambedkar) विचाराची (Thinking) गरज आहे. याच विचारातून मंगळवार पेठेत निलेश आल्हाट व रीना आल्हाट यांचे गेली अनेक वर्षे समाजाभिमुख कार्य चालू ठेवली आहे. भविष्य काळात त्यांच्यावर रिपाई, भाजपा युतीच्या माध्यमातून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी डॉ बाबासाहेब यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केलं.
कार्यक्रमाचे आयोजन रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे युवक आघाडीचे कार्याध्यक्ष निलेश आल्हाट व रिपाई युवती आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष रीना आल्हाट यांनी केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांना शाल व निळा फेटा व घालून सत्कार करण्यात आला. मंगळवार पेठ येथे कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
यावेळी सुमारे दहा हजार नागरिकांना अन्नदान व बिसलेरी पाणी चे वाटप करण्यात आले. या सोहळ्यात गणेश वाडेकर, संदीप खर्डेकर, ॲड मंदार जोशी, कल्पना बहिरट, गौरी बिडकर, वैशाली सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद साठे यांनी केले.
यावेळी अतुल पोकळे, प्रशांत वाघमारे, अक्षय धेंडे, रोहन गायकवाड, ऋतिक जाधव , राज पडसाळे, जुबेर शेख, मयूर सुपेकर आदींचे सहकार्य लाभले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.