'सॅनिटरी वेस्ट'साठी रेड स्पॉट मोहीम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

पुणे - शहरातील "सॅनिटरी वेस्ट'ची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका, "स्वच्छ' आणि खासगी कंपन्या यांच्या वतीने "रेड स्पॉट' मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून "स्वच्छ' संस्थेच्या कचरावेचक महिलांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत असून, तिला अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी दिली.

पुणे - शहरातील "सॅनिटरी वेस्ट'ची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका, "स्वच्छ' आणि खासगी कंपन्या यांच्या वतीने "रेड स्पॉट' मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून "स्वच्छ' संस्थेच्या कचरावेचक महिलांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत असून, तिला अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी दिली.

महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप, संस्थेचे हर्षल या वेळी उपस्थित होते.

कुणाल कुमार म्हणाले, 'शहरात निर्माण होणाऱ्या "सॅनिटरी' कचऱ्यासाठी महापालिकेने काही ठिकाणी यंत्रे बसविली आहेत; मात्र त्याचा उपयोग होत नाही. तरीही त्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय, या मोहिमेंतर्गतही प्रभावी उपाययोजना केल्या जाणार आहेत. या मोहिमेसाठी "सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिब्लिटी'अंतर्गत मदतीसाठी खासगी संस्था पुढे आल्या आहेत. स्वच्छ संस्थेचे सुमारे 2 हजार 600 कचरावेचक रोज विविध प्रकारचा साडेसहाशे टन कचरा जमा करतात. त्यात "सॅनिटरी वेस्ट'चे प्रमाण पाच टक्के आहे. शालेय विद्यार्थीनी आणि औषध विक्रेत्यांच्या माध्यमातून ही मोहीम घरोघरी पोचविण्यात येईल.''

हर्षद म्हणाले, 'हा कचरा रस्त्यावर टाकला जातो. त्यामुळे तो वेचताना वेचकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यासाठी "रेड स्पॉट' मोहीम राबविण्यात येत आहे. हा कचरा कागदामध्ये व्यवस्थित गुंडाळून त्यावर फक्त एक "रेड स्पॉट' द्यायचा आहे.''

प्लास्टिक बाटल्यांसाठी उपक्रम
शहरात जमा होणाऱ्या "प्लास्टिक'च्या बाटल्यांपासून कपडे तयार करण्याचा उपक्रम कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी'च्या (सीएसआर) माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी "आर्टस अलाइव्ह फाउंडेशन'ची नेमणूक करण्यात आली आहे.

या उपक्रमात रोज सुमारे 15 लाख बाटल्या जमा करण्याचे नियोजन असून, त्यातून रोजगारनिर्मितीही होणार आहे. यासाठी पुणे हॉटेलिअर्स असोसिएशन सहकार्य करणार आहे. रिकाम्या बाटल्या नियमित देण्यात येतील, असे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या उपक्रमाबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार, ""केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी शहरात 40 केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यात जमा झालेल्या रिकाम्या बाटल्या एका यंत्राच्या माध्यमातून "क्रश' करण्यात येतील.''

Web Title: red spot campaign for sanitary waist