शंभूराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण त्वरीत करा- युवराज संभाजीराजे

प्रसाद पाठक
रविवार, 14 मे 2017

"जर प्रशासन ऐकत नसेल तर आम्हाला उपोषणाला बसायला बोलवा आम्ही येऊ," असे संभाजीराजे यांनी सांगितले. 

पुणे : डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि चौथऱ्याच्या नुतनीकरणाचे काम प्रशासनाने त्वरीत हाती घ्यावे, असे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व कोल्हापूरच्या गादीचे वारस युवराज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रशासनाला उपोषणाचाही इशारा दिला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खासदार संभाजीराजे यांनी येथे शंभूभक्तांशी संवाद साधला. संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुतळ्याच्या ठिकाणी खासदार संभाजीराजे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अनेक शंभूभक्त जमले होते. यावेळी खासदार संभाजीराजे यांचे भाषण झाले. या निमित्त बोलताना त्यांनी सुशोभीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. 
"जर प्रशासन ऐकत नसेल तर आम्हाला उपोषणाला बसायला बोलवा आम्ही येऊ," असे संभाजीराजे यांनी सांगितले. 

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅली काढण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महराजांच्या जयजयकार करीत युवकांनी या रॅलीला मोठा प्रतिसाद दिला. 
 

व्हिडीओ गॅलरी