भाजप उमेदवार भोसलेंना अपक्ष लढण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पुणे- पुणे महापालिका निवडणुकीत रेश्मा भोसले यांनी अपक्ष लढावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिले आहेत.

रेश्‍मा भोसले यांना कायद्याचे उल्लंघन करून बहाल करण्यात आलेली भाजपची उमेदवारी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, रेश्‍मा भोसले यांची भारतीय जनता पक्षाची उमेदवारी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोमवारी अधिकृत करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगावर भाजपने राजकीय दबाव आणून अनुकूल निर्णय करून घेतल्याची टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली होती. भोसले यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अधिकृत उमेदवारी पत्र (एबी फॉर्म) भाजपचे जोडले होते. त्यासोबत पत्र जोडून ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपली असल्यामुळे उमेदवारी अर्ज भाजपचा असल्याचे गृहीत धरावे, असे त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले होते.

छाननीमध्ये अर्ज आणि एबी फॉर्म वेगवेगळ्या पक्षांचे होते. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना अपक्ष उमेदवाराचा दर्जा देण्यात यावा, असे मत व्यक्त केले; परंतु अंतिम आदेश देण्यापूर्वी त्यांनी या बाबत महापालिका आयुक्तांमार्फत निवडणूक आयोगाकडे रविवारी सायंकाळी विचारणा केली. आयोगाने सोमवारी दुपारी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून भोसले यांना भाजपची उमेदवारी देता येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय जाहीर केला. मात्र, याप्रकरणी भाजपच्या एका नेत्याने राजकीय हितसंबंध वापरून निवडणूक आयोगाला तातडीने अनुकूल निर्णय घ्यायला भाग पाडला, असा आरोप या प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी केला होता.