रेश्‍मा भोसलेंना अपक्षच लढावे लागणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

पुणे - रेश्‍मा भोसले प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. त्यामुळे भोसले यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने भोसले यांना अपक्ष उमेदवार ठरविले आहे. त्याच्याविरोधात भोसले यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शनिवारी त्यावरील सुनावणी पूर्ण झाली होती. पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी प्रभागातील (क्र. 7) कॉंग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

या पार्श्‍वभूमीवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, की निवडणूक प्रक्रिया सुरू असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणे योग्य वाटत नाही. या प्रकरणात काही त्रुटी असू शकतील; परंतु अन्य काही महत्त्वाची प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे याबाबत आम्ही हस्तक्षेप करणार नाही. याप्रकरणी हस्तक्षेप करता येत नसल्याबद्दल खंत व्यक्त करत असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. 

घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी भोसले यांना गेल्या आठवड्यात इस्त्री हे निवडणूक चिन्ह प्रदान केले आहे. भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला; परंतु भाजपचा एबी फॉर्म त्यांना वेळेत सादर करता आला नव्हता.

Web Title: reshma bhosale independent