बारामती परिसरात सायकल चळवळला प्रतिसाद

1baramati_cycle.jpg
1baramati_cycle.jpg

बारामती  : तब्येत सुदृढ राहावी या उद्देशाने तसेच पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यात हातभार लागावा या उद्देशाने बारामती परिसरात सायकल चळवळ आकार घेत आहे. सकाळमध्ये एप्रिल महिन्यात बारामती सायकल क्लबचे सदस्य असलेल्या नीलेश घोडके यांच्या संदर्भात बातमी प्रसिध्द झाल्यानंतर सायकलचा वापर वाढण्यास मदतच झाल्याची माहिती सायकल क्लबचे प्रमुख अँड. श्रीनिवास वायकर यांनी दिली. 

सन 2012 मध्ये चार जणांपासून सुरु झालेल्या सायकल क्लबचे आज 223 सदस्य आहेत. ज्यांना नवीन सायकल घ्यायची आहे अशा लोकांना बारामती सायकल क्लबच्या माध्यमातून परिपूर्ण मार्गदर्शन केले जाते. वापराचे स्वरुप, बजेट व इतर बाबींचा विचार करुन त्यांनी कोणती सायकल खरेदी करावी याचे मार्गदर्शन विनामूल्य क्लब करतो. कोणत्या व्यक्तीला कोणती सायकल उपयुक्त ठरेल हे सुचविले जाते. अनेकदा काही जणांकडे पुरेसे पैसे नसतात, अशा वेळेस काही महिन्यांसाठी संबंधित व्यक्तीच्या उधारीची हमीही क्लबच्या वतीने घेतली जाते. 

सकाळमध्ये नीलेश घोडकेंच्या बाबत सकाळमध्ये बातमी प्रसिध्द झाल्यानंतर आजवर जवळपास 113 जणांनी नवीन सायकली खरेदी केल्या. विशेष म्हणजे केवळ शहरातच नाही तर काटेवाडी व सोमेश्वर सारख्या ग्रामीण भागातूनही लोक नियमित सायकल चालवू लागले आहेत. शारिरीक स्वास्थ्य कायम ठेवणे हा याचा प्रमुख उद्देश आहे. सायकलींगसारखा दुसरा उत्तम व्यायाम नसल्याचे वैद्यकीय व्यावसायिकांकडूनही सांगितले गेल्याने बारामतीसारख्या ग्रामीण भागातही सायकलची चळवळ आता जोर धरु लागली आहे. वेगाने वाढणारी सायकलींची संख्या पाहता काही वर्षात बारामती हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले गेल्यास आश्चर्य वाटायला नको. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com