‘मॅंगो मेनिया रेसिपी शो’ला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

पुणे - प्रसिद्ध शेफ प्रसाद कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने मॅंगो चॉकलेट फज, मॅंगो पायनापल स्मुदी, मॅंगो सालसा, थाइ मॅंगो सलाड, कायरस-सासम आदी वैविध्यपूर्ण पदार्थ आंबाप्रेमींना सहजपणे तयार करायला शिकविले. विशेष म्हणजे आमरसाव्यतिरिक्त एवढे उत्तम पदार्थ तयार करता येऊ शकतात, हे पाहून उपस्थित अचंबित झाले.  

निमित्त होत ‘सकाळ मधुरांगण’ने आयोजित केलेल्या ‘मॅंगो मेनिया रेसिपी शो’चे. आंबाप्रेमींच्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे शेफ प्रसाद व त्यांच्या टीमने दिली. ‘मॅंगो मेनिया रेसिपी शो’ नंतर न्युट्रिशियन तज्ज्ञ अमृता कुलकर्णी यांनी महिलांच्या आरोग्याविषयी उपयुक्त माहिती दिली. याप्रसंगी पाककृती स्पर्धेचेही आयोजन केले होते. मधुरांगण सभासद व ‘सकाळ’च्या वाचकांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. काही जणींच्या नावीन्यपूर्ण पाककृतींना परीक्षक तसेच स्पर्धकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाची संकल्पना ‘सकाळ’च्या मुख्य व्यवस्थापिका (ब्रॅंड प्रमोशन व इव्हेंट) नेहा नगरकर यांची होती. रमा मालखरे यांनी सहकार्य केले. महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी (ता. १) पुणे व पिंपरी-चिंचवड कार्यालयास सुटी असून, मंगळवार (ता. २)पासून ‘मधुरांगण’चे सभासदत्व घेऊ शकता. 

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक अभिषा जोशी, द्वितीय शीतल जगताप, तृतीय माधुरी सोनाळकर यांना तर उत्तेजनार्थ पारितोषिक वर्षा तेलंग, सुमेधा मोरे, शीतल गवस, राधा राजूरकर व स्वाती जोशी यांना मिळाले. ‘पुणेरी फेस्टिव्हल’ हे या स्पर्धेचे बक्षीस प्रायोजक होते.