सेवानिवृत्त ही मानसिकता दूर करा - श्रीनिवास पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

पुणे - आयुष्यभर कष्ट करून विविध पदांवर काम केल्यानंतर सन्मानाने निवृत्त होतो; पण सेवानिवृत्त झालोय याचे दुःख मनात ठेवू नका. सेवानिवृत्त ही मानसिकता दूर करून लोकसेवेला प्रवृत्त व्हा, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. 

बालगंधर्व रंगमंदिर येथे निवृत्त पोलिस कल्याण संघाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या वेळी अतिरिक्त महासंचालक (कारागृह) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, संघाचे अध्यक्ष सुरेश कमलाकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल पाटील म्हणाले, ‘‘पोलिस खात्यांमध्ये विविध पदांवर कुटुंबाला वेळ न देता, समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले. सन्मान उपभोगल्यानंतर सेवानिवृत्त होताना दुःख मानता कामा नये. कुटुंबात हेळसांड होतेय, अशी कुरबूर न करता मुला-मुलींना स्वातंत्र्य द्या. संधी मिळाली नाही म्हणून मागे राहिलेत, त्यांच्याकडे पाहा. तुम्ही सुखी व्हाल.

तुमच्या पाठीमागे लोक काय बोलतात, ती तुमची खरी पावती आहे. दुःखाच्या, अडचणीच्या वेळी मदत केली तर ती व्यक्ती आयुष्यभर तुम्हाला विसरत नाही. त्यामुळे आयुष्यात माणसे पेरत जा, कुठेही अडचण येणार नाही.’’

डॉ. उपाध्याय म्हणाले, ‘‘समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम ज्यांनी केले, त्या ज्येष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांना सलाम करावासा वाटतो. योगासने, व्यायाम, ध्यानधारणा करून आरोग्यदायी जीवन मृत्यूचे भय न बाळगता सेवानिवृत्तीचे आयुष्य जगा.’’ 

या वेळी नव्वदी पार केलेल्या ज्येष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

Web Title: retire Mentality shrinivas patil