36 वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 

अर्जुन शिंदे
गुरुवार, 31 मे 2018

आळेफाटा (पुणे) : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे श्री संभाजी विद्यालयात, नुकतेच सन 1982 च्या इयत्ता दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी  जवळपास 36 वर्षांनी एकत्र येत शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

आळेफाटा (पुणे) : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे श्री संभाजी विद्यालयात, नुकतेच सन 1982 च्या इयत्ता दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी  जवळपास 36 वर्षांनी एकत्र येत शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

बोरी बुद्रुक येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री संभाजी विद्यालय आहे. याठिकाणी सन 1982 च्या बॅचचे सुमारे 50 विद्यार्थी, सहकुटुंब एकत्र आले आले होते. यावेळी शिक्षकांसह सर्वच जण जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले होते. यावेळी हे सर्वजण आपण अजूनही दहावीत असल्याच्या आठवणी जागवत आनंदाचे क्षण अनुभवत होते. या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावाप्रसंगी तत्कालीन मुख्याध्यापक एस. टी. गांजवे, मुख्याध्यापक डी. एस. इचके, बोरी बुद्रुकच्या सरपंच पुष्पा कोरडे, स्मार्ट व्हिलेज मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रतिनिधी पूनम सातपुते, माजी शिक्षक ब्रम्हे, घोलप, देशमुख, शिंदे आदींची उपस्थिती होती.

बी.एस.एन.एल. चे कार्यालयीन अधीक्षक मारुती कोरडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सन 1982 च्या इयत्ता दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थी असलेले जीएसटीचे उपायुक्त दत्तात्रय फुलसुंदर, एकनिष्ठ पुरस्कारप्राप्त रंगनाथ जाधव, टाटा हॉस्पिटल मुंबई येथे कॅन्सर पीडितांसाठी काम करणाऱ्या अंजना राणे, पोलीस अधिकारी मारुती जाधव, बी.एस.एन.एल. चे कार्यालयीन अधीक्षक मारुती कोरडे या विविध ठिकाणी वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेस कुस्तीच्या मॅटसाठी 25 हजार रुपयांची  देणगी  मुख्याध्यापक डी. एस. इचके यांचेकडे सुपूर्द करण्यात आली.  अनेक माजी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात शिकणारे विद्यार्थी व समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्याध्यापक गांजवे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय जाधव , दत्तात्रय पटाडे, रंगनाथ जाधव, लक्ष्मण धावडे, भानुदास पटाडे, हुसेन चौगुले, अंजना राणे, उषा वामन, निर्मला सोनवणे, गीताराम पटाडे, मच्छिन्द्र जाधव, बारकू जाधव, पांडुरंग कोरडे यांनी विशेष श्रम घेतले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप वाघोले यांनी, तर आभार प्रदर्शन सुरेंद्र चोरडिया यांनी केले.

Web Title: reunion of students of 1982 batch meet after 36 years