महसूल वसुलीत पुणे जिल्हा अव्वल ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

पुणे - विभागीय आयुक्तालयाच्या अधिकार क्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये 1 हजार 235 कोटी 47 लाख रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला. उद्दिष्टापेक्षा 115 टक्‍क्‍यांनी वसुली जास्त असून, त्यामध्ये सर्वाधिक महसूल पुणे जिल्ह्यातून मिळाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार, जमीन महसूल, करमणूक कर आणि गौणखनिज या तीन स्रोतांच्या माध्यमातून 2016-17 या आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 235 कोटी 47 लाख रुपये महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात आला. विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक महसूल पुणे जिल्ह्यातून वसूल करण्यात आला. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून 684 कोटी 36 लाख रुपये, साताऱ्यातून 111 कोटी 76 लाख रुपये, सांगलीतून 89 कोटी 71 लाख, कोल्हापूरमधून 115 कोटी 40 लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात आला. 

गतवर्षी 2015-16 या आर्थिक वर्षांमध्ये 1 हजार 212 कोटी 44 लाख रुपये महसूल वसूल केला होता. त्या तुलनेत 115 टक्‍क्‍यांनी वसुली जास्त करण्यात आली. 

पुणे विभागीय शाखेअंतर्गत पाच जिल्हे येतात. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक महसूल जमा करण्यात आला. राज्यात सर्वाधिक महसूल देणारा पुणे जिल्हा ठरला असून, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून 684 कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला. 
- सुधाकर तेलंग, पुणे विभागीय उपआयुक्त 

सन 2016-17 आर्थिक वर्षामध्ये पुणे विभागाची जिल्हानिहाय महसूल वसुली 

जिल्हा उद्दिष्ट (कोटी रुपये) महसूल वसुली (कोटी रुपये) 
पुणे 631.40 684.36 
सातारा 106.05 111.76 
सांगली 87.38 89.73 
सोलापूर 147.80 234.22 
कोल्हापूर 103.71 115.40 
-------------------------------------------------------------- 
एकूण 1 हजार 235 कोटी 47 लाख रुपये