रिंगरोडसाठी जागा देण्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

फुरसुंगी - पूर्व हवेलीच्या गावांतून रिंगरोड गेल्याने चांगला विकास होईल त्यामुळे या रस्त्यासाठी जागा देणारे शेतकरीही योग्य मोबदला मिळाल्यास जागा देण्यास तयार आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध एक इंचही जागा प्रशासन घेऊ शकणार नाही, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी होळकरवाडी ग्रामस्थांच्या बैठकीत केले.

सुळे यांनी त्यांच्या मतदारसंघातील पूर्व हवेलीच्या वडकी, उरुळी देवाची, शेवाळेवाडी, होळकरवाडी, औताडेवाडी, हांडेवाडी, वडाची वाडी, उंड्री, पिसोळी या गावांचा दौरा करून समस्या जाणून घेतल्या. प्रस्तावित रिंगरोडमध्ये जागा जाणाऱ्या होळकरवाडीतील शेतकऱ्यांशी सुळे बोलत होत्या. जालिंदर कामठे, सुरेखा चौरे, जिल्हा नियोजन समिती सदस्या अर्चना कामठे, सचिन घुले, रोहिणी राऊत, राहुल शेवाळे, नंदकुमार काळभोर, राजेंद्र खांदवे, प्रकाश हरपळे, भारती शेवाळे, लोचन शिवले, विजया भोसले यांसह वरील नऊ गावांचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, विविध खात्यांचे अधिकारी यांचा या दौऱ्यात सहभाग होता. प्रत्येक गावात जाऊन सुळे यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन स्थानिक समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. नागरिकांच्या मागणीनुसार लवकरच गावात पाण्याचे टॅंकर सुरू करणार असल्याचे सुळे यांनी या वेळी सांगितले. काहीच सुविधा मिळत नसल्याचे उरुळी व उंड्रीच्या ग्रामस्थांनी सांगितले.

Web Title: ringroad place oppose