नदीसुधार योजनेचा प्रकल्प पुण्यात राबवू - जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

पुणे - देशात ८५ टक्के मैलापाणी नद्यांमध्ये सोडले जात असल्याने त्या मलिन झाल्या आहे; परंतु देशातील नद्यांचे शुद्धीकरण करण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. त्याअंतर्गत पुण्यातील मुळा आणि मुठा नद्यांच्या शुद्धीकरणासाठी एक हजार कोटींची योजना केंद्राने दिली आहे. यातून अहमदाबादपेक्षा नदीसुधार योजनेचा प्रकल्प पुण्यात राबवू, अशी ग्वाही केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

राज्यातील मुळा, मुठा, पवना, कृष्णा, रामनदी, इंद्रायणी, भीमा, सीनार, गोदावरी, पंचगंगा या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने जीवनसरिता उपक्रम हाती घेतला आहे. कोथरूडमध्ये आयोजित कार्यक्रमात या नद्यांचे पाणी असलेल्या अकरा कलशांमध्ये श्री श्री रविशंकर, जावडेकर, आमदार मेधा कुलकर्णी आदीच्या हस्ते ‘एंझाइम’ टाकून उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्या वेळी जावडेकर बोलत होते.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे कार्यकर्ते पवना नदीपासून नदी शुद्धीकरणाची सुरवात करणार आहेत. 

कोथरूडमध्ये श्री श्री रविशंकर यांचा सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यास भक्तांची मोठी गर्दी होती. नदीसुधार प्रकल्पाच्या उद्‌घाटनापूर्वी भजनाचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये गोविंद श्‍याम, राधेकृष्णा हे भजन सुरू झाल्यानंतर सर्व भक्तांनी मनमुराद आनंद लुटला.

तिसरे महायुद्ध झाले, तर ते पाण्यावरून होईल, अशी चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे पाण्याचे संरक्षण हे आपले आद्यकर्तव्य आहे. आपल्या संस्कृतीत पाण्याला खूप महत्त्व आहे. जे सर्वांना शुद्ध करते, त्याचे प्रदूषणापासून रक्षण करणे आपला धर्म आहे.’’
- श्री श्री रविशंकर, आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक