गॅस कंपनीला रस्ते खोदाईची परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

पुणे - ""पुणे महापालिकेने महानगर नॅचरल गॅस कंपनीला (एमएनजीएल) शहरामध्ये खोदाईसाठी पूर्ण परवानगी दिली असून, काम सुरू झाले आहे. कंपनीने खोदाई मुक्त पद्धतीचा वापर करण्यास असमर्थता दर्शविल्याने परवानगी आम्ही नाकारली होती, मात्र आता 37 किलोमीटरच्या अंतरासाठी "जमेल त्या पद्धतीने' खोदाई करण्यास सांगितले आहे,'' असे महापालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी "सकाळ'ला सांगितले. "एमएमजीएल'ने महापालिका खोदाईसाठी परवानगी देत नसल्याने ग्राहकांना पाइपद्वारे गॅस पुरवठा करणे अशक्‍य असल्याचे सांगितले होते. 

"एमएनजीएल'तर्फे शहरात पाइपद्वारे गॅसपुरवठा करण्याची योजना राबविली जात आहे. मात्र गेल्या ऑक्‍टोबरपासून हे काम ठप्प होते. यासंदर्भात कंपनीकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी हे काम पालिकेच्या परवानगीमुळे खोळांबल्याचे सांगितले होते. त्यावर "सकाळ'च्या प्रतिनिधीने पंतप्रधानांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. पंतप्रधान कार्यालयाने विचारणा केल्यानंतर सूत्रे वेगाने हलली व शहरातील पाइप लाइन टाकण्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. 

यासंदर्भात राजेंद्र राऊत म्हणाले, """एमएनजीएल'ला आम्ही 2015-16पर्यंत सुमारे 150 किलोमीटर अंतरापर्यंत खोदाईची परवानगी दिली होती. मात्र ऑक्‍टोबर 2016मध्ये झालेल्या ठरावानुसार शहरात खोदाई मुक्त पद्धतीचा वापर (एचडीडी) अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र कंपनीने या पद्धतीने काम करण्यास असमर्थता दर्शविली. त्यासाठी खर्च जास्त येतो, वेळ जास्त लागतो, जमिनीखालील खडक कठीण आहे, अशी कारणे सांगण्यात आली व त्यामुळे आम्ही परवानगी नाकारली. कंपनीतर्फे पूर्ण शहरासाठीचा मास्टर प्लॅन दिला गेलेला नाही. तसे केल्यास आम्हाला नियोजन करणे सोपे जाईल. पृष्ठभागावर खड्डे खणल्यास रस्त्याची एकसंधता जाते व दुरुस्तीनंतरही सातत्याने खड्डे पडत राहतात, त्यामुळे पालिका खोदाई मुक्त पद्धतीचा आग्रह धरते. पालिका कंपनीला खोदाईसाठी परवानगी का नाकारली, हेही कंपनीने माध्यमांकडे स्पष्ट करणे अपेक्षित होते.'' 

महापालिकेच्या निर्णयामुळे गॅसपुरवठ्याचे काम थांबल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आमच्याकडे विचारणा झाली. या कामाची निकड लक्षात घेऊन आम्ही कंपनीला "जमेल त्या पद्धतीने' पुढील खोदाई करण्याची परवानगी दिली आहे. आता कंपनीने पूर्ण केलेल्या कामांची माहिती पालिकेला देणे अपेक्षित आहे. 
-राजेंद्र राऊत, रस्ते विभाग, प्रमुख, महापालिका 

Web Title: Road digging permission gas company