कोयत्याचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न; व्यापारी जखमी

4thief_13.jpg
4thief_13.jpg

पुणे  : मुंढवा येथील एका सराफा व्यापा-यावर चार ते पाच जणांनी मिळून कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयन्त केला. यावेळी व्यापाऱ्याने विरोध केला असता दरोडेखोरांनी व्यापा-यावर कोयत्याने वार केले. यामध्ये व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (ता.26) दुपारी दीडच्या सुमारास मुंढवा येथील हरिकृष्ण ज्वेलर्स येथे घडली.

मिलन सोनी (वय 35, रा.मुंढवा) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. मिलन सोनी यांचे केशवनगर मुंढवा येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास चार ते पाच जण तोंडाला रुमाल बांधून दुकानात शिरल.  कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील ऐवज लुटण्यास सुरुवात केली. दरम्यान, सोनी यांनी हल्लेखोरांचा विरोध केला असता चोरट्यांनी त्यांच्या अंगावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. सोनी यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोर तेथून पसार झाले.

घडलेल्या प्रकारची माहिती पोलिसांना कळवताच मुंढवा पोलिस घटनास्थळी पोहचले. हल्ल्यात जखमी झालेल्या सोनी यांना खाजगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यावरून आरोपींना शोधण्याचे काम मुंढवा पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com