रिपब्लिकनचे कार्यकर्ते संभ्रमात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

पुणे = रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) शहर कार्यकारिणी आणि उमेदवारांवर केलेल्या कारवाईनंतर आता नेमके काय करायचे, अशा संभ्रमावस्थेत पक्षाचे कार्यकर्ते आहेत. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निर्णयाकडे लागले आहे. हा तिढा सोडविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर शुक्रवारी (ता. 10) पुण्यात येण्याची शक्‍यता आहे. 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर येथील पक्षाच्या उमेदवारांनी भाजपचे "कमळ' चिन्ह घेण्यावरून पक्षाचे राज्य चिटणीस राजा सरोदे यांनी केलेली कारवाई, त्याला पुण्याचे निरीक्षक व राष्ट्रीय कोशाध्यक्ष एम. डी. शेवाळे यांनी दिलेले प्रत्युत्तर याची गुरुवारी दिवसभर शहरात चर्चा होती. या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह सामान्य कार्यकर्त्यांकडून सातत्याने विचारणा सुरू होती. काही पदाधिकाऱ्यांनी राज्य पातळीवरील नेत्यांसह थेट आठवले यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आठवले यांचा निरोप घेऊन थुलकर हे पुणे दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. 

या संदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

कारवाईमुळे सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडूनही असंख्य प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. "चिन्ह नसल्यामुळे कारवाई करता येते; मग चिन्ह मिळावे म्हणून हे पदाधिकारी ठोस भूमिका का घेत नाहीत. अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी का प्रयत्न करत नाहीत?' असा प्रश्‍न काहींनी उपस्थित केला; परंतु कारवाईच्या निर्णयामुळे नेमके काय करावे, या संदर्भात बहुतांश कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा होती. दरम्यान, पक्षाच्या सर्व उमेदवारांनी गुरुवारचा दिवस प्रचारामध्ये घालविला. ठिकठिकाणी प्रोत्साहनाबरोबरच मोलाचे सल्लेही दिले गेल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. 

Web Title: rpi candidate in pmc election