महापालिकेच्या तिजोरीत 42 कोटी रुपये जमा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

पुणे - आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेच्या तिजोरीत मिळकतकराचे 42 कोटी रुपये जमा झाले आहेत. शहरातील साडेआठ लाख मिळकतधारकांना टपालामार्फत बिले पाठविण्यात आली आहेत. 

महापालिकेने मिळकतकर भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. 31 मेपर्यंत मिळकतकर भरणाऱ्यांना पाच टक्के सवलत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे मिळकतप्रमुखाला पाच लाख रुपयांच्या अपघात विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. यामुळे या वर्षी पहिल्या आठवड्यात महापालिकेच्या तिजोरीत गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मिळकतकर जमा झाला आहे. 

गेल्या वर्षी 24 कोटी रुपये इतका मिळकतकर जमा झाला होता, अशी माहिती मिळकतकर विभागाचे सहप्रमुख दयानंद सोनकांबळे यांनी दिली. शहरात सुमारे साडेआठ लाख मिळकतधारक आहे. त्यांना दोन टप्प्यांत टपाल विभागामार्फत बिले पाठविली आहेत. पहिल्या टप्प्यात साडेपाच लाख आणि दुसऱ्या टप्प्यात तीन लाख बिले पाठविली आहेत. अपूर्ण पत्ता, मोकळी जागा अशा विविध कारणांमुळे गेल्या वर्षी 70 हजार बिले परत महापालिकेकडे आली होती. ही बिले परत येऊ नयेत, यासाठी या वेळी बिलामागे मेल आयडी आणि संबंधितांचा मोबाईल क्रमांकही दिला असून, घर बंद असल्यास त्या मिळकतदाराशी संपर्क साधावा, अशी विनंती टपाल विभागाला केली आहे. 

* मिळकतकर विभागात रोख, धनादेश व ऑनलाइन पद्धतीने कर जमा करता येतो 
* धनादेश न वटल्यास रकमेनुसार तीनशे ते पाच हजार रुपये इतका दंड वसूल केला जाणार 
* अपघात विमा योजनेची जबाबदारी आरोग्य विभागाकडे 

Web Title: Rs 42 crores deposited by the municipal corporation