जिल्हा परिषदेकडुन इंदापुरमध्ये 58 कोटींचा निधी : प्रवीण माने

जिल्हा परिषदेकडुन इंदापुरमध्ये 58 कोटींचा निधी : प्रवीण माने

भिगवण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इंदापुर तालुक्यामध्ये विकासाची घोडदौड सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन तालुक्यामध्ये दीड वर्षाच्या कालावधीमध्ये 58 कोटी रुपयांचा विक्रमी निधी खेचुन आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांवर तालुक्यातील विरोधकांकडुन दावा सांगण्यात येत असल्याची टिका जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी केली. 

डिकसळ (ता.इंदापुर) येथील दलितवस्ती सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन तर बंदिस्त गटार योजना, प्रभाग क्रमांक तीनमधील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव गायकवाड, धनाजी थोरात, विजयकुमार गायकवाड, सचिन बोगावत, रामहारी चोपडे, जयदीप जाधव, अण्णासाहेब धवडे, विष्णुपंत देवकाते, सुरेश बिबे, संजय बंडगर व डिकसळ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

माने पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन तालुक्यातील शाळा, अंगणवाड्या, रस्त्यांसाठी निधी आणुन गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यावेळी हनुमंत बंडगर, शंकरराव गायकवाड, जयदीप जाधव, सचिन बोगावत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजयकुमार गायकवाड सुत्रसंचालन अर्जुन सुर्यवंशी यांनी केले तर आभार रावसाहेब गवळी यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com