ग्रामीण भागात मातीची बैल पुजण्याची वेळ...

बैल पोळा
बैल पोळा

टाकळी हाजी (पुणे): शेती व्यवसाय करत असताना कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न वाढविण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत झाले. शेतात यांत्रीक वापर वाढल्याने पारंपारीक शेती करण्याकरीता वापरले जाणाऱ्या बैलांच्या संख्येत घट झाली आहे. अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांकडे बैलजोडी दिसत आहे. या उलट शर्यती बंद झाल्या असल्या तरी देखील छंदापोटी लाखो रूपयांची महागडी बैल संभाळण्याचे काम शेतकरी करताना दिसू लागला आहे.

काही भागात श्रावणी तर काही भागात भाद्रपदी पोळा हा सण शेतकऱ्यांन मध्ये साजरा होताना दिसतो. पुर्वीच्या काळात शेतकऱ्याची शान व कुटूंबाचा एक घटक असलेल्या जीवाभावाच्या बैलजोडीचे अस्थित्व असायचे. वर्षभर शेतात काबाडकष्ट केल्यावर त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पोळा हा सण साजरा करण्याचा हा दिवस. परंतू आज ग्रामीण भागात मातीची बैल पुजण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. गायरान जमीनीवर अतीक्रमण झाल्यामुळे गायींच्या संख्येत घट होऊन परीणामी बैलांच्या संख्येत घट झाली आहे. पुर्वीच गावदल आता नाहीसे होऊन गावरान गायी बोटावर मोजण्या इतक्या अस्तीत्वात आहे. शेतातील सर्व कामे आता यंत्राच्या सहाय्याने झटपट केली जातात. ज्या गोठ्यात बैलजोडी बांधली जायची त्या गोठ्यात आता ट्रॅक्टर दिसू लागला आहे. बदलत्या काळानूसार शेतीची संकलप्ना देखील बदलल्या आहेत. घटती बैलांची संख्या व गायींची संख्या शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.

अनेक शेतकऱ्यांनी बैलगाडा शर्यतीतून महागड्या बैलजोडीचा छंद जोपासला. लाडक्या बैलांच्या पालन पोषणाकरीता कितीही खर्च झाला तर मागेपुढे पाहिले जात नाही. एकेकाळी घाटाचा राजा म्हणून ज्याने अनेक घाट गाजविले. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बैलगाडा शर्यती बंद असल्यामुळे लाखो रूपयांची बैलजोडी गोठ्यात बांधून ठेवली जात आहे. लाखो रूपयांचा खुराक या बैलांना चालू असताना त्यांच्या पासून कोणतेच उत्पन्न मिळत नाही. बैल हा धावणाराच प्राणी... असा प्राणीतज्ञ समितीचा अहवाल आल्याने शेतकऱ्यांना पुन्हा शर्यती चालू होणार अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.

सणासाठी आखडता हात...
कांद्याला बाजार नाही... टोमॅटो फेकून द्यायची वेळ आली. शेतात काय बी पिकवा भांडवल पण वसूल होत नाही. खिशात असल्यावर खर्च करायला काय वाटत नाय. घुंगरमाळा घ्यायच्या होत्या पण लागवडीला खर्च झाला. त्यामुळ मनमारून पोळा सणाला जरा आखडता हात घेतल्याच्या प्रतिक्रिया शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपरखेड, आमदाबाद, जांबूत, काठापूर खुर्द येथील शेतकऱ्यांमधून येत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com