‘ऋण शौर्यगाथा’ आनंद सोहळा उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

पुणे - देशाच्या सीमांचे संरक्षण करताना जायबंदी होणाऱ्या जवानांचे पुनर्वसन करण्यात ‘क्वीन मेरीज्‌ टेक्‍निकल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड सोल्जर्स’ (क्‍यूएमटीआय) ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावते. या संस्थेच्या शताब्दी वर्षात हाती घेण्यात आलेल्या ‘ऋण -अब हमारी जिम्मेदारी’ या उपक्रमाच्या समारोपानिमित्त ‘ऋण शौर्यगाथा’ हा चार दिवसांचा आनंद सोहळा शुक्रवारपासून (ता. ५) होत आहे. ‘रिडिफाइन कन्सेप्टस्‌’च्या पुढाकाराने होणाऱ्या या सोहळ्यात मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबर ‘मराठी-ऋण कलाकार क्रिकेट लीग’ही होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ या सोहळ्यासाठी माध्यम प्रायोजक आहे.

गणेश कला क्रीडा मंच येथे शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या या कार्यक्रमात अभिनेत्री, नृत्यांगना शर्वरी जमेनिस यांच्यासह ‘चला हवा येऊ द्या’ व ‘सा रे ग म लिटील चॅम्पस्‌’ या लोकप्रिय कार्यक्रमांतील कलाकार सहभागी होणार आहेत. जखमी जवानांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या ‘क्‍यूएमटीआय’च्या प्रयत्नांना हातभार लावणारा हा उपक्रम देशभर पोचवण्यासाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या खास संदेशाची चित्रफीतही या वेळी दाखवली जाणार आहे. या संस्थेतील जखमी जवानांना मोलाची साथ देणाऱ्या वीरपत्नींचाही या वेळी सन्मान केला जाणार आहे. दक्षिण महाराष्ट्र सब एरिया प्रमुख मेजर जनरल प्रीती सिंग उपस्थित राहणार आहेत.

नेहरू स्टेडियम येथे शनिवारपासून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘मराठी-ऋण कलाकार क्रिकेट लीग’मध्ये महेश मांजरेकर, अंकुश चौधरी, नागनाथ मंजुळे, संजय जाधव, आकाश ठोसर, ‘एस्सेल व्हीजन’चे आकाश पेंढारकर, मेधा मांजरेकर, श्रुती मराठे यांच्यासह शंभराहून अधिक कलाकारांचे सहा संघ सहभागी होणार आहेत. या सामन्यांसाठी ‘रिडिफाइन कन्सेप्ट्‌स’सह कलाकार फॅक्‍टरीचा पुढाकार आहे. ‘ऋण शौर्यगाथा’ कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका ‘सकाळ’च्या ५९५, बुधवार पेठ येथील कार्यालयात सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत उपलब्ध होतील.

ऋण शौर्यगाथा
 नृत्य-गीत-नाट्य कार्यक्रम
 शुक्रवार, (ता. ५)
 सायंकाळी ६ वाजता
 गणेश कला क्रीडा मंच 

कलाकार क्रिकेट लीग
 शनिवार (ता. ६) ते 
 सोमवार (ता. ८)
 नेहरू स्टेडियम

Web Title: Run shoryagatha