#SaathChal आई-वडिलांसाठी वारीत चालण्याचा संकल्प

#SaathChal आई-वडिलांसाठी वारीत चालण्याचा संकल्प

पुणे - प्रत्येक स्त्री ही माउली असते. मातेप्रती आदरभाव व्यक्त करणे, हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच जन्मदात्यांना विसरून कसे चालेल. आईवडिलांचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी आम्ही आषाढी वारीमध्ये चालणारच, असा निश्‍चय व्यक्त करीत ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’च्या ‘साथ चल’ उपक्रमात सहभागी होण्याचा निर्धारही कॅंटोन्मेंट परिसरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केला. 

हिंद तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप गिरमकर यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या बैठकीत परिसरातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्वांनी एकमुखाने शपथ घेऊन ‘साथ चल’ या उपक्रमास पाठिंबा दर्शविला. महेंद्र भोज (कामाठीपुरा मंडळ), गौरव परदेशी (हिंद बाल मंडळ), अर्चना दंडे (आझाद हिंद), बलदेव ठाकूर (गणेश सार्व. मित्र मंडळ), आनंद पाटोळे (न्यू निर्माण मित्र मंडळ), नितीन अडसुळे (भीमज्योत मंडळ), माधुरी गिरमकर (तनिष्का व्यासपीठ), विकास भांबुरे (कर्तव्य फाउंडेशन), तुषार खेमकर (यंग बॉईज मंडळ), अक्रम खान (बज्मे रहेबर कमिटी), गिरीश उरड (राजेश्‍वर मंडळ), अनिल यादव (वीर तरुण), अमोल अरगडे (स्नेहसंवर्धक मंडळ) आदी उपस्थित होते.  हिंद तरुण मंडळाचे विश्‍वस्त ॲड. प्रशांत जाधव म्हणाले, ‘‘प्रत्येक स्त्री हे ‘माउली’चे स्वरूप आहे. त्या ‘माउली’कडे लक्ष वेधण्यासाठी ‘सकाळ’ने ही आरोग्याची वारी आरंभिली आहे. आपण सारे कुटुंबीयांसह या दिंडीत सहभागी होऊन आईवडिलांसाठी चालूयात.’’ 

सध्या टीव्ही, व्हॉट्‌सॲपचा काळ आहे. या काळात तरुण पिढी आईवडिलांना विसरते की काय, असे वाटते. मात्र तरुण पिढीमध्ये आईवडिलांप्रती प्रेम भावना, आदरयुक्त जाणीव निर्माण व्हावी यासाठी ‘सकाळ’ राबवीत असलेला ‘साथ चल’ हा उपक्रम प्रशंसनीय आहे.  
-दिलीप गिरमकर, अध्यक्ष, हिंद तरुण मंडळ ट्रस्ट 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com