#SaathChal संत सोपानदेव पालखी सोहळ्यावरती पुष्पवृष्टी

SaathChal Saint Sopanadev Palkhi Celebration Flowering
SaathChal Saint Sopanadev Palkhi Celebration Flowering

वालचंदनगर (ता.इंदापूर) : येथे संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्यावरती युवकांनी गुलाबांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी करुन पालखी सोहळ्याचे अनोख्यापद्धतीने स्वागत केले.

संत सोपानदेव महाराज यांचा पालखी सोहळा आज सकाळी लासुर्णे येथील मुक्काम आटोपून निरवागांच्या मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. लालपुरी येथील विसाव्यानंतर कळंब गावाच्या वेशीवर पालखी सोहळा येताच सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगेश डोंबाळे मित्र परीवाराच्या वतीने युवकांनी संत सोपानदेवांच्या पालखी व वारकऱ्यांच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्याची पुष्पवृष्टी केली.

अनोख्या पद्धतीने स्वागत झाल्याने पालखी सोहळ्यातील वारकरी भारावून गेले. गावामध्ये पालखी सोहळा येताच सरपंच उज्वला फडतरे, पंचायत समिती सदस्या शैला फडतरे, सुहास डोंबाळे, आप्पासाहेब अर्जुन, रामचंद्र कदम, तलाठी विलास भोसले यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी शिवसनेचे योगेश कणसे यांनी वारकऱ्यांना वृत्तपत्रांचे तर काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी फळांचे वाटप केले. निमसाखरमध्ये पालखी दुपारचा विसावा झाला.

यावेळी सरपंच अरुणा चव्हाण, माजी सरपंच गोविंद रणवरे, विजयसिंह रणवरे, नंदकुमार पाटील, वीरसिंह रणसिंग, रविंद्र रणवरे, जयकुमार कारंडे, अनिल रणवरे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. निमसाखरच्या विसाव्यानंतर पालखी सोहळा निरवांगीच्या मुक्कामासाठी रवाना झाला. निरवांगीमध्ये सरपंच रेखा माने, माजी सरपंच दशरथ पोळ, दत्तात्रेय पोळे, शंकर शेंडे यांनी स्वागताची तयारी केली होती.

संतराज महाराज पालखी सोहळा...
संतराज महाराजांचा पालखी सोहळा कुरवलीचा मुक्काम आटोपून रेड्याच्या मुक्कामासाठी रवाना झाला. चिखली, कळंब, निमसाखर, निरवांगीच्या नागरिकांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com