#SaathChal आषाढी वारीवर आधारित छायाचित्र स्पर्धा

Drawing-Competition
Drawing-Competition

पुणे - भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफी व सकाळ सोशल फाउंडेशनने आषाढी वारीवर आधारित छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. हौशी, नवोदित व अनुभवी छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली आहे. स्पर्धकांना एकूण पंचवीस हजार रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी आहे.

‘इंद्रायणी ते चंद्रभागा-चित्रप्रवास’ या स्पर्धेत संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम व विविध संतांच्या दिंड्यांशी संबंधित छायाचित्रांचा समावेश असावा. मोबाईल किंवा कोणत्याही कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठविता येतील. परंपरागत वारीतील वेगळेपण टिपण्याचा प्रयत्न स्पर्धकाने केल्यास त्याचा आवर्जून उल्लेख करावा.

पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे दहा हजार, सात हजार व पाच हजार रुपयांची तसेच एक हजार रुपयांची तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. 

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफी हे या छायाचित्र स्पर्धेचे प्रायोजक असून संस्थेचे कार्यवाह डॉ. विश्‍वजित कदम यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

संस्थेत अत्याधुनिक तंत्र तसेच यंत्रसामग्रीद्वारे छायाचित्रण पदवीविषयक प्रशिक्षण देण्यात येते. या वर्षापासून व्यावसायिक फोटोग्राफी व फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफी हे प्रत्येकी तीन वर्षांचे छायाचित्रण पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

स्पर्धेसाठी नियम 
यंदाच्या आषाढी वारीत घेतलेल्या छायाचित्रांचा समावेश असावा.
स्पर्धकांनी १२ बाय ८ या आकारात छायाचित्रे wariphoto@esakal.com या ईमेलवर पाठवायची आहेत.
प्रत्येक स्पर्धक २५ ते ३० छायाचित्रे पाठवू शकतील.
प्रत्येक छायाचित्रासोबत स्पर्धकाने आपले नाव, मोबाईल क्रमांक, तारीख, छायाचित्र काढलेले ठिकाण व प्रसंगाचे नाव ही माहिती फोटोच्या एका कोपऱ्यात (मूळ छायाचित्र बाधित न होता) वॉटरमार्क करून पाठवायचे आहे. मूळ छायाचित्रांवर रंगसंगतीद्वारे कोणतेही संगणकीय कृत्रिम बदल केलेले नसावेत.
अधिक माहितीसाठी संपर्क - राहुल - ८६०५०१७३६६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com