सहकारनगर- पद्मावतीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

सहकारनगर - शिवसेना उमेदवारांनी संभाजीनगर, चव्हाणनगर, तीन हत्ती चौक, सहकारनगर, पद्मावती, शिवदर्शन भागातून दुचाकी रॅली काढली. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सामाजिक कार्य आणि जनसंपर्कामुळे शिवसेनेचेच उमेदवार विजयी होणार, असा विश्वास नगरसेवक शिवलाल भोसले, माउली दारवटकर, पूजा देडे, श्रृत्ती नाझिरकर यांनी व्यक्त केला. 

दारवटकर म्हणाले, ""बंद पडलेल्या देखाव्यातून सामान्य जनतेला नक्की काय फायदा झाला, याचा विचार जनता नक्कीच करेल व परिवर्तन घडवेल.'' 

नगरसेवक भोसले म्हणाले, ""पंचवीस वर्ष जनतेचा विकास करू शकले नाहीत, असे उमेदवार पुन्हा मतदारांना गृहीत धरून विकासाच्या नावावर जनतेला भूलवत आहेत. अशा उमेदवारांना जनता निवृत्त करेल.'' 

पूजा देडे म्हणाल्या, ""तळजाई झोपडपट्टीतील कष्टकरी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मितीस प्राधान्य देणार आहे.'' 

प्रत्यक्ष गाठीभेटी, पदयात्रा, रॅलीमुळे शिवसेना उमेदवारांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून सहकारनगर- पद्मावती (प्रभाग 35) मध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार, असा विश्‍वास शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना आहे. नगरसेवक शिवलाल भोसले यांचा पाच वर्षातील अनुभव व दांडगा जनसंपर्क यामुळे ते राष्ट्रवादीपुढे आव्हान ठरणार आहेत. माउली दारवटकर यांचा वीस वर्षांचा सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा तसेच संघटनेच्या माध्यमातून चांगला जनसंपर्क असल्याने ते कॉंग्रेसला भारी ठरतील, असे चित्र आहे. तळजाई वसाहत येथे पूजा देडे व सहकारनगर येथील श्रृती नाझिरकर यांचाही जनसंपर्क दांडगा असून प्रभाग 35 मध्ये शिवसेना पॅनेल आघाडी घेणार असल्याचे दिसत आहे.

Web Title: sahakaranagara Padmavati