आजपासून भव्य ऑटो एक्‍स्पो

आजपासून भव्य ऑटो एक्‍स्पो

पुणे - स्वत:च्या मालकीची कार असावी, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारपासून (ता. १७) भव्य ‘ऑटो एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे.

कार घेणे ही खूप अवघड गोष्ट आहे, असा अनेकांचा गैरसमज असतो. शिवाय वेगवेगळ्या गाड्यांच्या फीचर्समुळेही बरेच जण कोणती कार घ्यावी, या संभ्रमात असतात. कार खरेदीबाबतचे गैरसमज आणि ग्राहकांच्या मनातील सर्व संभ्रम दूर करून त्यांना मनासारखी कार खरेदी करता यावी, यासाठी ‘सकाळ’ने दोन दिवसांच्या ऑटो एक्‍स्पोचे आयोजन केले आहे. 
कार घ्यायची म्हटल्यावर ठिकठिकाणच्या शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांच्या फीचर्सची माहिती घ्यायची, त्यांची तुलना करायची, बजेट लक्षात घ्यायचे अशा हजारो प्रश्‍नांची उत्तरे शोधत फिरावे लागते; पण या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे जेव्हा एकाच छताखाली मिळतात तेव्हा खऱ्या अर्थाने कार घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरते. 

या एक्‍स्पोमध्ये केवळ नव्या कार्ससोबतच रिसेल कारचीही मोठी शृंखलाही पाहायला मिळणार आहे. यामध्ये शरयू टोयाटो, ह्युंदाई, विराज स्कोडा, रोहर्ष मोटर्स रेनॉ, मायकार नेक्‍सा, होंडा कार्स, बी. यू. भंडारी फोक्‍सवॅगन आदी कंपन्या सहभागी असून, होंडा ऑटो टेरेसच्या प्री ऑन कारची माहितीही या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. पंडित फार्म, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर येथे शनिवार (ता. १७) आणि रविवार (ता.१८) असे दोन दिवस हा एक्‍स्पो होणार असून, स्मॉल कार, सेडान कार, हॅच बॅक कार, लक्‍झरी कार, एसयूव्ही, स्पोर्ट अशा कितीतरी गाड्यांची माहिती येथे मिळणार आहे. त्यांच्या किमती आणि ईएमआयसंबंधीच्या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी मिळतील. 

दोन दिवस चालणारा हा एक्‍स्पो सकाळी ११ ते रात्री ७ या वेळेत सर्वांसाठी खुला आहे.

काय : ऑटो एक्‍स्पो
कुठे : पंडित ऑटो फार्मस्‌, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर 
कधी : १७ आणि १८ डिसेंबर
वेळ : सकाळी ११ ते रात्री ७ 
प्रवेश व पार्किंग मोफत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com