उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

दानशूर व्यक्तींना आवाहन
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या कामाला समाजातील दानशूर व्यक्तींकडून नेहमीच पाठिंबा मिळत आला आहे. हुशार, जिद्दी, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देता यावी, असा ‘फाउंडेशन’चा प्रयत्न आहे. यापुढील काळातही समाजाच्या सर्व स्तरांतून ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला मिळणारी आर्थिक मदत वाढत गेली, तरच हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची ही वाढीव रक्कम देता येणे शक्‍य होणार आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी हातभार लावावा, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ करीत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - २४४०५८९७, २४४०५८९४ किंवा २४४०५८९५. (वेळ - सकाळी १० ते दुपारी १)

भारतात, तसेच परदेशातील संस्थांमध्ये उच्चशिक्षण घेऊन जिद्द, मेहनत आणि धडपडीच्या बळावर यश मिळवू पाहणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येकी ६० हजार रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली आहे. ही शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचा संक्षिप्त परिचय ‘सकाळ’च्या वाचकांना आजपासून करून देत आहोत. या सर्व शिष्यवृत्तीधारकांना त्यांच्या पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे शुभेच्छा!

अक्षय उदय गडीकर (वय २३) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संगणक अभियंता ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील ‘स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क’ येथे प्रवेश. टेबल टेनिसची आवड असून, विद्यापीठाकडून या खेळाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

जगदीश रामेश्‍वर व्यास (वय ४६) - शिवाजी विद्यापीठातून इलेक्‍ट्रॉनिक्‍स अभियंता ही पदवी प्राप्त. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची लायब्ररी सायन्स विषयातील पदव्युत्तर पदवी व याच विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात संशोधन सुरू. पुस्तक, वृत्तपत्र वाचनाची आवड. युवा महोत्सवात मूकनाट्याबद्दलचे पहिले पारितोषिक प्राप्त.

ऋतुजा राजन जगताप (वय २१) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बायोटेक्‍नॉलॉजी या विषयात पदवी प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी इंग्लंडमधील ‘नॉटिंगहॅम ट्रेन्ट’ विद्यापीठात प्रवेश. बॅडमिंटन, वक्तृत्व, काव्य यांची आवड असून, विविध पारितोषिकेही प्राप्त.

ऋतुजा प्रशांत लेले (वय २३) - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून ‘प्लॅनिंग’ या विषयामधील अभियांत्रिकीची पदवी प्राप्त. ‘सस्टेनेबल रिसोर्स मॅनेजमेंट’ या विषयातील उच्चशिक्षणासाठी जर्मनीतील म्युनिक येथील ‘टेक्‍निकल युनिव्हर्सिटी’ येथे प्रवेश. याच विद्यापीठाची स्कॉलरशिप प्राप्त. जर्मन भाषेचा अभ्यास.

अमेय नंदकुमार वासुलकर (वय २३) - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून यंत्र अभियांत्रिकीमधील पदवी प्राप्त. पुढील उच्चशिक्षणासाठी जर्मनीतील ‘बर्लिन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍नॉलॉजी’ व नेदरलॅंड मधील ‘डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍नॉलॉजी’त प्रवेश. ‘फ्ल्युइड पॉवर, फ्ल्युईड मेकॅनिक्‍स’ या विषयावर ४०व्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पेपर सादर. बासरीवादन व ड्रायव्हिंगची आवड.

पूर्वा किशोर गायकवाड (वय २२) - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून संगणक अभियंता ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील ‘रॉयल मेलबर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी’ येथे प्रवेश. बारावीमध्ये पुणे विद्यापीठात मुलींमध्ये प्रथम. व्हॉलिबॉलची आवड असून, जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग.

मुदस्सर अख्तर शेख (वय २७) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. इलेक्‍ट्रॉनिक्‍स ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. याच विषयातील पीएचडीसाठीचे संशोधन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे सुरू. सध्या न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे व्याख्याता म्हणून कार्यरत. पुस्तके वाचण्याचा छंद.

सौरभ एकनाथ दांडगे (वय २५) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संगणक अभियंता ही पदवी प्राप्त. ‘डेटा अँड नॉलेज इंजिनिअरिंग’ या विषयातील उच्चशिक्षणासाठी जर्मनीतील ‘ऑटो व्हॉन ज्युरीक युनिव्हर्सिटी’ येथे प्रवेश. गिर्यारोहण, संगीत, फुटबॉल, बॅडमिंटन याची आवड.

चिन्मयी जयंत गाडगीळ (वय २३) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन अभियंता ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील ‘रूटगर्स, द स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू जर्सी’, येथे प्रवेश. नृत्य व चित्रकलेची आवड असून, अनेक पारितोषिकेही प्राप्त.

सतीश आनंदराव बुध्धवार (वय २५) - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी नेदरलॅंडमधील ‘डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍नॉलॉजी’ येथे प्रवेश. पुस्तक वाचण्याची आवड असून, सामाजिक कार्यातही सहभाग.

दानशूर व्यक्तींना आवाहन
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या कामाला समाजातील दानशूर व्यक्तींकडून नेहमीच पाठिंबा मिळत आला आहे. हुशार, जिद्दी, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देता यावी, असा ‘फाउंडेशन’चा प्रयत्न आहे. यापुढील काळातही समाजाच्या सर्व स्तरांतून ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला मिळणारी आर्थिक मदत वाढत गेली, तरच हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची ही वाढीव रक्कम देता येणे शक्‍य होणार आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी हातभार लावावा, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ करीत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - २४४०५८९७, २४४०५८९४ किंवा २४४०५८९५. (वेळ - सकाळी १० ते दुपारी १)

Web Title: Sakal India Foundation Support students for higher education