अधिकाऱ्यांना खडबडून जाग 

बुधवार, 30 मे 2018

पुणे  - गेले तीन दिवस "सकाळ'ने विवाह नोंदणी कार्यालयातील गैरसोयी आणि एजंटची शासकीय कारभारातील लुडबूड याबाबत वार्तांकन केले. त्यानंतर विवाह नोंदणी कार्यालयाशी संबंधित अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. हे कार्यालय कलेक्‍टर ऑफ स्टॅम्प या कार्यालयाच्या अखत्यारीत येते. "सकाळ'च्या बातमीनंतर कलेक्‍टर ऑफ स्टॅम्पचे अनिल पारखे यांनीही विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन पाहणी केली. कार्यालयातील गैरसोयी आणि एजंटद्वारे होणारे व्यवहार यांविषयी कार्यालयाकडून खुलासा मागवला असल्याचे सांगितले. 

ते म्हणाले, ""विवाह अधिकारी नंदकर यांच्याकडून लेखी खुलासा मागवला आहे. तसेच पोलिस स्टेशनला पत्र देण्याचेही सुचविले आहे. जर विवाह नोंदणी कार्यालयातून एजंटबाबत काही पाउल उचलले गेले नाही, तर मी स्वतः याबाबत पोलिस स्टेशनला पत्र देईन. सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही विवाह नोंदणी कार्यालय परिसरात शेड उभारणे आणि बसण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात पत्र लिहिले होते. त्याचा पाठपुरावा आता नक्की केला जाईल. 

इतर सरकारी कार्यालयात जसे एजन्टला पैसे देऊन व कर्मचाऱ्यांना पैसे चारून काम झटपट करून घेता येते तसेच येथे अनुभवास येते. माझ्या एका मित्राला मोठी देणगी द्यावी लागली. 
- कुमुदिनी साळुंके, नागरिक 

येथील अधिकारी जास्तीचे पैसे मागून घेतात व ते कशाचे विचारल्यावर ध्वजनिधीचे असे उत्तर देतात. यांना सैनिकांच्या नावाखाली पैसे खाताना लाजही वाटत नाही. यापुढे ध्वजनिधी सांगून पैसे मागितले तर ध्वजाची मागणी करावी. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय जवळच आहे. शेवटचा उपाय म्हणून तेथे जाऊन तक्रार नोंदवावी. 
- योगेश कानगुडे, नागरिक 

विवाह नोंदणी कार्यालयात बसण्यासाठी तसेच इतर सोयी नसल्याने कुटुंबातील सर्वांना जमता येईल अशा जागी आम्हाला मुलाचे लग्न करायचे आहे. म्हणून आम्ही पुण्यातच एका हॉटेलमध्ये नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचे ठरविले. विवाह नोंदणीसाठी येण्याजाण्याचा खर्च आम्ही द्यायला तयार आहोत. पण येथील एजंटने नऊ हजार रुपयांची मागणी केली आहे. इतकी रक्कम आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे हा विवाह खर्चाशिवाय पार पडेल की नाही याबाबत आम्ही साशंक आहोत. 
- ज्येष्ठ नागरीक , पिंपरी चिंचवड 

Web Title: sakal news impact Marriage Registration Office