फिरत्या चाकावरती... 

sakal NIE activity
sakal NIE activity

सकाळ एनआयई उन्हाळी सुट्टी कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद 

पिंपरी : "सकाळ' माध्यम समूहाच्या "सकाळ एनआयई' (न्यूज पेपर इन एज्युकेशन) उपक्रमांतर्गत आयोजित "उन्हाळी सुटीतील धमाल' कार्यशाळेचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 14) झाले. शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या यमुनानगर येथील विद्यालयात ही कार्यशाळा झाली. यामध्ये मानसी महाजन यांनी ओएचपी शीटवर विविध रंगांचे ग्लास पेंटींग व पेपर क्विलिंगच्या शोभिवंत "टी लाईट होल्डर' सोप्या पध्दतीने कसे करायचे हे शिकविले. 

बारामती येथील घनश्‍याम केळकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत अरेबियन कथा सादर केल्या. यामध्ये सिंदबाद व त्याच्या सागर सफरींचा थरारक अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना कथन केला. तसेच हरिभाऊ कर्डेकर यांनी पारंपारिक चाकावर विद्यार्थ्यांसमोर माती कामाचे प्रात्यक्षिक सादर केले. या मातीकामात त्यांनी माठ, पणती व मातीचे विविध आकार साकारले. 

या कार्यशाळेत मुलांना प्रात्यक्षिक आणि स्वनिर्मितीचा आनंद मिळाला. "सकाळ एनआयई' उपक्रमाचे सहव्यवस्थापक विशाल सराफ, अक्षया केळसकर यांनी संयोजन केले. एम.टेक इंजिनिअर्सचे मनीष कोल्हटकर व मंदार किराणे कार्यशाळेचे मुख्य प्रायोजक होते. 

"सकाळ एनआयई' हे विद्यार्थ्यांसाठी मुक्त व्यासपीठ असून, उन्हाळ्याच्या सुटीतील कार्यशाळेतून दरवर्षी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण गोष्टीं शिकायला मिळतात. लहान मुले सध्या टिव्ही,सोशल मिडीयाच्या वापरामुळे घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी उन्हाळी सुट्टीमध्ये होणाऱ्या अशा कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभागी व्हावे. यामुळे व्यक्तिमत्व विकास चांगला घडतो. "सकाळ' एनआयईच्या कार्यशाळेत सलग आठ वर्षे सहभागी होत असल्याचा"एम-टेक इंजिनिअर्स' संस्थेला अभिमान आहे. 

मनिष कोल्हटकर व मंदार किराणे 
संचालक 
एम.टेक इंजिनिअर्स, 
भोसरी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com