सकाळ रिलीफ फंडातून ओढा खोलीकरणामुळे बदलले ओढ्याचे रुप

संतोष आटोळे
शनिवार, 30 जून 2018

'सकाळ' चे सामाजिक कार्य कौतुकास्पद
याबाबत बोलताना सरपंच बाळासाहेब आटोळे म्हणाले येथे नुकत्याच झालेल्या पावसाने येथील खोलीकरण केलेल्या ओढ्यात पावसाचे पाणी साचले आहे.तसेच आगामी काळात पावसाचे पाणी अडून ते जमिनीत जिरल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. यामुळे गावचा पाणीप्रश्न कायमचा दुर होईल. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्यासह अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे तसेच नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सकाळ माध्यम समुहाचे कार्य कौतुकास्पद आहे.  सर्वांचे विशेष आभार मानतो.

शिर्सुफळ : गाडीखेल (ता. बारामती) येथे अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती अॅग्रो व सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने ओढा खोलीकरणाचे 1 हजार 540 मीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे चार कोटीहुन लिटरहुन अधिक पाण्याचा साठा होणार आहे. 

गाडीखेल या गावाने 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप ' स्पर्धेत यंदा भाग घेतला होता. त्यानुसार स्पर्धेच्या कालावधीत येथे  विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. येथील ओढ्याचे खोलीकरण करण्यात यावे, यासाठी येथील ग्रामस्थांनी व तनिष्का व्यासपीठाच्या वतीने जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्याकडे केली होती. त्यानुरुप देण्यात आलेल्या पोकलेश मशिनसाठी सकाळ रिलीफ फंडामधुन डिझेल साठी निधी देण्यात आला.

त्यानुसार झालेल्या खोलीकरणाच्या माध्यमातुन येथील ओढ्याचे 1540 मीटर लांबी,  सरासरी .11मीटर रुंदी व 2 ते 3 मीटर असे एकूण  28, 293 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. याकामामुळे 4 कोटी 18 लाख लिटर एवढा पाणीसाठा होणार आहे. तसेच आगामी काळात मोठ्या प्रमाणावर पाणी जमिनीमध्ये मुरणार आहे.यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढ होणार आहे.

यंदा येथे करण्यात आलेल्या  विविध जलसंधारण कामांमुळे मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी अडून ते जमिनीत जिरल्याने दुष्काळ आणि पाणी टंचाई संपुष्टात येवून गाव पाणीदार होईल असा विश्वास सरपंच बाळासाहेब आटोळे, उपसरपंच नानासाहेब जगताप, शरद शेंडे, तानाजी आटोळे, दिलीप आटोळे, अनिल आटोळे, विश्वास आवदे, ग्रामसेवक अरुण जाधव यांनी व्यक्त केला. 

'सकाळ' चे सामाजिक कार्य कौतुकास्पद
याबाबत बोलताना सरपंच बाळासाहेब आटोळे म्हणाले येथे नुकत्याच झालेल्या पावसाने येथील खोलीकरण केलेल्या ओढ्यात पावसाचे पाणी साचले आहे.तसेच आगामी काळात पावसाचे पाणी अडून ते जमिनीत जिरल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. यामुळे गावचा पाणीप्रश्न कायमचा दुर होईल. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्यासह अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे तसेच नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सकाळ माध्यम समुहाचे कार्य कौतुकास्पद आहे.  सर्वांचे विशेष आभार मानतो.

Web Title: sakal relief fund work in Baramati