'अहंभाव सोडून संघभावना जपा '

sakal employee
sakal employee

पुणे - वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे सामाजिक अस्वस्थता निर्माण होत असून, तंत्रज्ञानाच्या या वादळामुळे अनेक गोष्टी नामशेष होत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या ‘डिजिटल’ युगात स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी सतत सतर्क राहणे, काळानुरूप बदलणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्वत:बरोबरच इतरांना प्रशिक्षित करणे आवश्‍यक आहे. या युगात वैयक्तिक श्रीमंती, अहंभाव आणि स्वसामर्थ्याकडेच अवाजवी लक्ष देण्याऐवजी संघभावना अधिक उपयुक्त ठरेल, असा मार्गदर्शनपर सल्ला ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी ‘सकाळ’च्या कर्मचारी वर्गाला रविवारी दिला.

‘सकाळ’च्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, संपादक मल्हार अरणकल्ले, कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप त्रिवेदी उपस्थित होते. ‘सकाळ’मध्ये प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या आणि २०१६ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गतवर्षी निवृत्त झालेल्यांमध्ये मोहन वैद्य, अविनाश गाडेकर, अशोक महल्ले, अशोक भोसले, सतीश अवचट, अनंत फाटक, अजित गांधी, विनायक आंबेकर, विलास शिंदे, अशोक गोरिवले यांचा समावेश होता.  

पवार म्हणाले, ‘‘प्रत्येक वर्षी नवनवी आव्हाने येत असून, ‘लोकल टू ग्लोबल’ असा प्रवास करावा लागतो आहे. या वाढत्या स्पर्धेतील आव्हानांवर मात करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. अशा स्पर्धेत सामाजिक जाणीव ठेवणेही महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आर्थिक प्रश्‍न सोडविण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजे. अनेक समाजांच्या मोर्चांमागे जातीयवाद नसून, त्या-त्या समाज घटकातील आर्थिक आणि सामाजिक प्रश्‍न आहेत. हे प्रश्‍न सर्व जातींत, प्रांतांत, धर्मांत आणि देशात आहेत. त्यामुळे यापुढे सामाजिक प्रश्‍नांबरोबरच आर्थिक प्रश्‍नांची उकल करणेही महत्त्वाचे ठरेल.’’ सुतार यांनी प्रास्ताविक केले. आसावरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

विजेत्यांना बक्षिसांचे वितरण
वर्धापन दिनानिमित्तच्या क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना या वेळी बक्षिसे देण्यात आली. यात विनायक बावडेकर, महेश निवंगुणे, भाऊसाहेब गायकवाड, मिलिंद भुजबळ, विशाल पवार, केतन खैरमोडे, राजन धिवार, तुषार तिकोणे, घनश्‍याम जाधव, योगेश निगडे, मेधा सूर्यवंशी, सीमा बोडके, ज्ञानेश्‍वर बिजले, कुंदन वीरकर, अश्‍विनी जाधव, आनंद लांडगे, सागर तरडे यांचा समावेश होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com