विद्यार्थ्यांना मिळाला ‘सकाळ’चा मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

भारतात तसेच परदेशातील संस्थांमध्ये उच्चशिक्षण घेऊन जिद्द, मेहनत आणि धडपडीच्या बळावर यश मिळवू पाहणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येकी ६० हजार रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली आहे. ही शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचा संक्षिप्त परिचय...

नीता बिभीषण डिसले (वय २३) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील सिरॅक्‍युस युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. याच विद्यापीठाची शिष्यवृत्तीही प्राप्त.

भारतात तसेच परदेशातील संस्थांमध्ये उच्चशिक्षण घेऊन जिद्द, मेहनत आणि धडपडीच्या बळावर यश मिळवू पाहणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येकी ६० हजार रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली आहे. ही शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचा संक्षिप्त परिचय...

नीता बिभीषण डिसले (वय २३) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील सिरॅक्‍युस युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. याच विद्यापीठाची शिष्यवृत्तीही प्राप्त.

मौशुमी प्रदीप व्यवहारे (वय २१) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशनमधील पदवी प्राप्त. इलेक्‍ट्रिकल विषयातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. गायन, चित्रकला, फोटोग्राफी यांची आवड. संस्कृत विषयाची आवड.

चैतन्य निरंजन शिंदे (वय २३) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनमधील पदवी प्राप्त. विद्युत व यंत्र अभियांत्रिकीमधील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील पर्ड्यु युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. बेसबॉल खेळण्याची आवड व पारितोषिकही प्राप्त. फोटोग्राफीचीही आवड.

सचिन श्रीकांत अवचट (वय २४) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून यंत्र अभियांत्रिकीची पदवी प्राप्त. उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील टेक्‍सास युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. या विद्यापीठाची शिष्यवृत्तीही प्राप्त. पोहण्याची आवड व स्पर्धांमध्ये पारितोषिकेही प्राप्त.

अभिषेक विजय फरांदे (वय २३) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकीची पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. सिंथेसायझर वाजविणे, पोहणे व स्केटिंगची आवड असून, पारितोषिकेही प्राप्त.

राहुल महादेव गुटाल (वय २४) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलिबॉल यांची आवड.

शैलेश संजय केळकर (वय २२) - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशनमधील पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. तसेच सुवर्णपदकाचा मानकरी. संगणक विषयातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍सास येथे प्रवेश. टेबलटेनिस, फुटबॉल खेळणे, पोहणे याची आवड. महाराष्ट्र प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती प्राप्त. संस्कृत विषयाची आवड.

ऋचा राजेंद्र ओक (वय २३) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इलेक्‍ट्रॉनिक्‍स अभियांत्रिकीची पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. विद्युत अभियांत्रिकीमधील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील टेक्‍सास युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. एरोबिक्‍सची आवड, राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक प्राप्त. स्केटिंगचेही जिल्हास्तरीय सुवर्णपदक प्राप्त. चित्रकला व वाचनाचीही आवड.

केतकी सुरेश चिंचोरकर (वय २६) - पुणे विद्यापीठातून माहिती तंत्रज्ञानामधील पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील टेक्‍सास युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, टेबल टेनिस यांची आवड व पारितोषिकेही प्राप्त. विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सहभाग.

केतकी श्रीकांत थत्ते (वय २६) - पुणे विद्यापीठातून माहिती तंत्रज्ञानामधील पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. संगणकशास्त्रातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील स्टिव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे प्रवेश. महाराष्ट्र प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती तसेच पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त. शास्त्रीय (कथक) नृत्याची आवड.

दानशूर व्यक्तींना आवाहन
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या कामाला समाजातील दानशूर व्यक्तींकडून नेहमीच पाठिंबा मिळत आला आहे. हुशार, जिद्दी, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देता यावी, असा ‘फाउंडेशन’चा प्रयत्न आहे. यापुढील काळातही समाजाच्या सर्व स्तरांतून ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला मिळणारी आर्थिक मदत वाढत गेली, तरच हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची ही वाढीव रक्कम देता येणे शक्‍य होणार आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी हातभार लावावा, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ करीत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - २४४०५८९७, २४४०५८९४ किंवा २४४०५८९५. (वेळ - सकाळी १० ते दुपारी १)

Web Title: sakal social foundation