सकाळ अभ्यासमाला मार्गदर्शक

Latif-Shaha
Latif-Shaha

चाकण - विद्यार्थ्यांच्या मनातील शंका व संभ्रमावस्था याची जाणीव ‘सकाळ’ला झाली. नवीन बदलाची माहिती प्रभावीपणे विद्यार्थी, पालक, शिक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी ‘सकाळ’ एक सक्षम माध्यम म्हणून काम करीत आहे. सकाळ दहावी अभ्यासमाला विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन भाषा अभ्यासक, समुपदेशक लतीफ शाह यांनी केले. 

दहावीचा नवीन अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांचे बदललेले स्वरूप, मूल्यमापनाची पद्धत यांची ओळख व्हावी, यासाठी सकाळ व श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने चाकण परिसरातील शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. 

शाह यांनी सांगितले, की दहावीच्या भाषा विषयांतील अभ्यासक्रमात श्रवण, भाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य व भाषाभ्यास या क्षमतांच्या विकासाबरोबरच कृतीपत्रिकांचे स्वरूप व आराखडा, गद्य, पद्य, स्थूलवाचन, व्याकरण, उपयोजित लेखन, भाषांतर यातील सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे. गणित विषयतज्ज्ञ प्रा. अनुजा पाटील यांनी कृतीपत्रिकेतील मूल्यमापन, गणिताची पायाभूत संकल्पना समजावून सांगितली. या वेळी विद्यालयाचे संस्थापक एस. पी. देशमुख, श्‍यामराव देशमुख, अक्षय देशमुख, सुमन देशमुख, रोहिणी देशमुख, हर्षल देशमुख, डी. पी. सोनवणे, मुख्याध्यापिका नीलम सिंह, कल्पलता डिकूज, रैना मून आदी उपस्थित होते. स्वागत संध्या वाळुंज यांनी केले. प्रास्ताविक ‘सकाळ’चे मुख्य वितरण व्यवस्थापक अब्दुल अजीज यांनी केले. सूत्रसंचालन वाळुंज, हर्षा वैद्य यांनी केले. आभार दीपक शिंदे यांनी मानले. या कार्यशाळेत खेड तालुक्‍यातील अठरा शाळांनी सहभाग घेतला.

इंग्लिश भाषा आत्मसात करण्यासाठी मुलांनी पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन केले पाहिजे.
- श्रीधर नागरगोजे, सदस्य, बालभारती, इंग्लिश भाषा समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com