सभासदत्व नोंदणी, नूतनीकरणास थोडेच दिवस शिल्लक

सभासदत्व नोंदणी, नूतनीकरणास थोडेच दिवस शिल्लक

सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच योजना; ७० वर्षांवरील ज्येष्ठांनाही दीड लाखाची सवलत मर्यादा

पुणे - उतारवयातही कोणावर अवलंबून न राहण्याची मानसिकता असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी गेली नऊ वर्षे खंबीरपणे उभ्या असलेल्या ‘सकाळ- सह्याद्री सुरक्षा कवच’ आरोग्य योजनेच्या दहाव्या वर्षांच्या नावनोंदणीस सुरवात झाली आहे. या योजनेचा कालावधी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ असा आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही व्यक्तीला यात सहभागी होता येईल. सर्वांसाठी १ लाख ५० हजार रुपयांची सवलत मर्यादा असून, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांनाही बिलात ७५ टक्के सवलत मिळणार आहे.

सभासदांना सवलतीच्या दरातील दर्जेदार आरोग्य सुविधांबरोबरच मनोरंजक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत एकदाही आंतररुग्ण सेवा न घेतलेल्या सभासदांसाठी सवलत मर्यादा १ लाख ८० हजार रुपये आहे. याशिवाय पॅथॉलॉजी चाचण्या, एमआरआय, एक्‍स-रे तपासणीवर ४० टक्के, बाह्यरुग्ण विभागातील उपचारांवर २० टक्के, दंतचिकित्सा व दंतोपचारांवर २५ टक्के, तर औषधांवर १० टक्के सवलत मिळणार आहे. याखेरीज तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी फक्त २०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. मोतीबिंदू शस्त्रक्रिया व कॅथरेटर अँजिओग्राफीसाठी विशेष पॅकेज उपलब्ध आहे. या सर्व सुविधा ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या पुण्यातील सर्व शाखांमध्ये उपलब्ध असेल.

नोंदणीची ठिकाणे 
(सकाळी ९.३० ते साय. ५.३०)
सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल : डेक्कन जिमखाना, कर्वे रस्ता, सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड ः वनाज कंपनीसमोर, पौड रस्ता; सूर्या हॉस्पिटल ः शनिवारवाड्याजवळ, कसबा पेठ; सह्याद्री हॉस्पिटल हडपसर ः मगरपट्टा कॉर्नर, पुणे- सोलापूर रस्ता, हडपसर; सह्याद्री हॉस्पिटल बिबवेवाडी ः सुहाग मंगल कार्यालयाशेजारी, बिबवेवाडी; सह्याद्री हॉस्पिटल बोपोडी ः (कै.) द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर दवाखाना, जनरल हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर, खडकी कॉर्नर, बोपोडी पोलिस चौकीजवळ; सह्याद्री हॉस्पिटल नगर रस्ता : हर्मिस हेरिटेज फेज २, शास्त्रीनगर, येरवडा.
 

शुल्क भरण्याचा तपशील
वय वर्षे ५० ते ६९ पूर्ण या गटासाठी रु. ३,१००+ रु. ६५० एकरकमी रोख भरावेत. किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे काढलेल्या रु. ३,१०० च्या आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’ या नावे काढलेल्या रु. ६५० च्या डीडी किंवा धनादेशाद्वारे भरावेत.
वय वर्षे ७० व अधिक या गटासाठी रु. ४,१५०+ रु. ६५० एकरकमी रोख भरावेत. किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे काढलेल्या रु. ४,१५० च्या आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’ या नावे काढलेल्या रु. ६५० च्या डीडी किंवा धनादेशाद्वारे भरावेत.

लाभार्थी शुल्क 
वय वर्षे ५० ते ६९ पूर्ण - रु. ३,७५०/- 
 वय वर्षे ७० व अधिक - रु. ४,८००/- 
हे आवश्‍यक...
सदस्यत्वाच्या नूतनीकरणासाठी सध्याचे ओळखपत्र आणि नव्याने सदस्यत्व घेण्यासाठी वयाचा व निवासाचा दाखला आवश्‍यक.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९६७३३३१२८९ किंवा ९६७३३३१२८४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com