लाइव्ह बॅंड अन्‌ थिरकणारी पावले 

लाइव्ह बॅंड अन्‌ थिरकणारी पावले 

पुणे - उसळत्या तरुणाईचे आवडते गायक आणि त्यांची गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकर तरुणांना मिळणार आहे. "रॉक ऑन' आणि "बेबी को बेस पसंत है', "जुम्मे की रात है' अशा गाण्यांवर पुण्यातील तरुणाई थिरकणार आहे. कारण फरहान अख्तर, बादशाह, मिका सिंग, विशाल व शेखर अशा नव्या पिढीच्या आयकॉन असणाऱ्या गायकांचा "सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018' येत्या 28 आणि 29 एप्रिलला पुण्यात होत आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लिनन किंग मुख्य प्रायोजक आहे. 

या धमाल कार्यक्रमात पहिल्या दिवशी फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा, तर दुसऱ्या दिवशी मिका सिंग व बादशाह यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रेक्षकांसाठी खास एक्‍सपिरिअन्स झोन, एफ अँड बी काउंटर व चिल झोन असणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका "बुक माय शो' आणि "इनसायडर इन' या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. 

सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018 
शनिवार : 28 एप्रिल 
सहभाग - फरहान अख्तर, विशाल व शेखर 
रविवार - 29 एप्रिल 
सहभाग - मिका सिंग, बादशाह 

कुठे : शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे 
केव्हा : संध्याकाळी 6 वाजल्यापासून. 
ऑनलाइन बुकिंगसाठी : bookmyshow.com किंवा insider.in व paytm 
अधिक माहितीसाठी संपर्क - 9011085255 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com