मैफलीसाठी पुणे शहर तर सर्वोत्तमच!

Summersault-event
Summersault-event

‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट’ या हॉट बॉलिवूड गाण्यांच्या कार्यक्रमात ‘डिजेवाले बाबू मेरा गाना बजा दे’ म्हणणाऱ्या बादशाहचा परफॉर्मन्स रविवारी (ता. २९) संध्याकाळी ६.३० वाजता असणार आहे. त्यानिमित्त त्याच्याशी केलेली बातचीत.

प्रश्‍न : सध्या भारतीय संगीतामध्ये पंजाबी आणि हिपहॉप कुठे पाहता?
-पंजाबी भाषेसह पंजाबी संगीत सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीवर आहे. इंडस्ट्रीचे ते अविभाज्य अंग आहे. या इंडस्ट्रीमध्ये बरेच मोठे कलावंत पंजाबी आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. दलजित दोसज्‌, गुरू रंधवा यांसारख्या कलावंतांनी पंजाबीला मोठे केले आहे. 

प्रश्‍न : केंड्रिक लमार या रॅपरने आपल्या अल्बमसाठी नुकतेच पुलित्झर जिंकले. तुझ्यासारख्या भारतीय रॅपर्सने असा सजग रॅपर्स बनण्याचा विचार केला आहे का? 
-इंग्रजीसारख्या जागतिक भाषेच्या तुलनेत हिंदी संगीताला पुरेशी मान्यता मिळायला हवी. लवकरच हिंदी गाणीही जागतिक स्तरावर येतील, असा मला विश्‍वास आहे. आपल्याकडेही उत्तम हिंदी गाणी लिहिली जातात. 

प्रश्‍न : हिपहॉप कलाकार कार्स, मुली, अल्कोहोल या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात का? तू करतो का?
-होय, बॉलिवूडमध्ये गीत लेखनाची प्रक्रिया ही चित्रपट निर्मात्यांनी दिलेल्या ब्रीफनंतर सुरू होते. त्यामुळे काही गाणी त्यांना अपेक्षित असलेल्या शैलीनुसार येतात. सुदैवाने मला माझे लेखन माझ्या वैयक्तिक आवडीनुसार करता येते. जसे, की बातचीत, बंदूक इत्यादी. माझे अजून एक गाणे सोनी म्युझिककडून येत आहे. नेहमीच्या पार्टी साँगपेक्षा हे वेगळे आहे. त्यात नवीन कथानकही आहे. प्रेक्षकांना ते निश्‍चित आवडेल, अशी मला आशा आहे. 

प्रश्‍न : तुझी सगळी गाणी सोशल मीडियावर आलेली आहेत. त्यामुळे लाइव्ह शोसाठी प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे अवघड वाटते का?
-नाही. सोशल मीडिया मुख्यतः आमच्यासाठी वरदानच आहे. जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स करण्यासाठी स्टेजवर पाय ठेवता, तेव्हा प्रेक्षक तुम्हाला फक्त ऐकतच नाहीत, तर ते तुमच्याबरोबर ताल धरतात. 

प्रश्‍न : चाहत्यांकडून कुठल्या प्रकारच्या फर्मायशी तुला येतात? त्यांचा फीडबॅक काय असतो? तू सोशल मीडियावर तुझ्या चाहत्यांबरोबर आहेस का?
-हो, मी माझ्या चाहत्यांच्या सतत संपर्कात राहण्यासाठी प्रयत्नशील असतो. तंत्रज्ञानाचा हा एक फायदा आहे, की तुम्हाला फीडबॅक लगेच मिळत असतो. हे खरेतर अस्सल आणि अपमानास्पद टिप्पणीचे मिश्रण असते; पण कलाकारांसाठी तेही महत्त्वाचे आहे. 

प्रश्‍न : तुझा समरसॉल्टमध्ये काय परफॉर्मन्स असेल? कुठल्या अन्‌ रिलीज ट्रॅकवर परफॉर्म करणार आहेस का? तुझा पुण्याचा अनुभव काय आहे?
-पुण्यात येण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मैफलीसाठी अगदी सर्वोत्तम असे हे शहर आहे. आस्था गिल माझ्यासोबत कार्यक्रमात असणार आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘बझ’ या ट्रॅकला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यात या गाण्याचा छोटासा भाग ऐकवला होता. आता सादरीकरण करणार आहोत. त्यामुळे त्या अनुभवाच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com