चाकणला ‘साखर खाल्लेला माणूस’ हाउसफुल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

चाकण - अभिनेते, विनोदवीर प्रशांत दामले व शुभांगी गोखले यांच्या ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाला रसिकांनी गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दामले यांच्या संवादांना रसिकांनी हशा आणि टाळ्यांच्या कडकडाट करून दाद दिली.

चाकण - अभिनेते, विनोदवीर प्रशांत दामले व शुभांगी गोखले यांच्या ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाला रसिकांनी गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दामले यांच्या संवादांना रसिकांनी हशा आणि टाळ्यांच्या कडकडाट करून दाद दिली.

चाकणमध्ये ‘सकाळ’च्या वतीने तीनदिवसीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सारा सिटी’ या नाट्यमहोत्सवाचे प्रायोजक आहे. या महोत्सवात पहिल्या दिवशी  ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाचा प्रयोग झाला. प्रशांत दामले, शुभांगी गोखले यांच्यासह अधोक्षण कऱ्हाडे, ऋचा आपटे यांच्या भूमिका असलेल्या या नाटकाला रसिकांची मोठी उपस्थिती होती. 
‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, सहयोगी संपादक रमेश डोईफोडे, मुख्य उपसंपादक नयना निर्गुण, जाहिरात विभागाचे मुख्य व्यवस्थापक मकरंद पावनगडकर यांच्यासह सारा सिटी ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी नाटकातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. नाटक व्यवस्थापक समीर हंपी, दीपक पवार यांचे आभार मानण्यात आले. सारा सिटीतर्फे किरण किर्ते यांनी सत्कार स्वीकारला. बातमीदार हरिदास कड यांनी सूत्रसंचालन केले.

नाट्य महोत्सवात आज...
नाट्यमहोत्सवात शनिवारी (ता. २६) ‘चैत्रालीचा नाद करायचा नाय’ हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम चाकणला पुणे- नाशिक महामार्गावरील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रवेश शुल्क ३०० व २५० रुपये आहे. ‘सकाळ’च्या बातमीदारांकडून लवकरात लवकर प्रवेशिका घेऊन आपली जागा लवकर आरक्षित करा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

‘सकाळ’ने ग्रामीण भागातील नाट्यरसिकांसाठी आयोजित केलेला नाट्यमहोत्सव उपक्रम कौतुकास्पद आहे. कमी खर्चात रसिकांना, गावातील लोकांना नाटके पाहावयास मिळतात. ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे ‘सकाळ’च्या आयोजनाचे यश आहे.
- नारायण करपे, संस्थापक, कलाविष्कार मंच, चाकण

‘सकाळ’ माध्यम समूह व सारा सिटीतर्फे आयोजित केलेला नाट्यमहोत्सव चांगला उपक्रम आहे. सारा सिटी गृहप्रकल्प परिसरातील अत्युत्तम गृहप्रकल्प आहे. कामगार, ग्राहकांना एक चांगले घर योग्य किमतीत सर्व सोयी, सुविधांनी युक्त देण्याचा प्रयत्न सारा सिटीने केलेला आहे. व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक कलेचा वारसा जतन करण्यासाठी नाट्य महोत्सव उपक्रम राबविला आहे. त्याचा फायदा नाट्य रसिक घेत आहेत.
- रूपेश अगरवाल, व्यवस्थापकीय संचालक, सारा सिटी

‘सकाळ’तर्फे आयोजित केलेला नाट्यमहोत्सव हा उपक्रम ग्रामीण भागात प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. ‘सकाळ’ने हा उपक्रम राबवून नाटक या सांस्कृतिक कलेचे एक जतन करण्याचा व नाट्यरसिकांना नाटक पाहण्याची संधी गावात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. नाटक पाहण्यासाठी रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हे नाटक हाउसफुल झाले, यावरून नाट्यमहोत्सवाला मोठा प्रतिसाद आहे हे पाहावयास मिळते.
- तुकाराम कांडगे, माजी अध्यक्ष, रोटरी क्‍लब

‘सकाळ’चा नाट्यमहोत्सव ग्रामीण भागातील नाट्यरसिकांसाठी एक चांगली मेजवानीच आहे. ‘सकाळ’ने ग्रामीण भागात आयोजित केलेल्या नाट्यमहोत्सवामुळे गावातील रसिकांना गावात कमी खर्चात नाटक पाहावयास मिळाले. पहिल्याच नाटकाला गर्दी हाउसफुल होती. हा नाट्यमहोत्सवाला मिळालेला उदंड प्रतिसाद म्हणावा लागेल.
- अपर्णा कानडे, सामाजिक कार्यकर्त्या

Web Title: sakhar khallela manus drama