संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

sambhaji-maharaj-jayanti
sambhaji-maharaj-jayanti

मांजरी - आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले व राजगड संवर्धन मोहिमेला आर्थिक मदत, मर्दानी खेळ तसेच वेशभूषा स्पर्धा असे विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबऊन आकाशवाणी हडपसर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आकाशवाणी शंभु जयंती जन्मोत्सव समितितर्फे शंभू भक्त व विवीध तरूण मंडळांच्या वतीने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

समितीच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विशेष काम करणाऱ्या स्नेहवन संस्थेला रोख ४० हजार रुपये तर राजगड संवर्धन मोहिमेला १६ हजार रुपये देण्यात आले. इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकोट व किल्ल्यांच्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली होती. रविंद्र जगदाळे यांच्या पथकाच्या मर्दानी खेळाचेही आयोजन करण्यात आले होते. दहा वर्षाखालील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध ऐतिहासिक महापुरूषांच्या वेशभूषा करून मुलांनी उपस्थितांमध्ये इतिहास जागविला. सोनम शिंदे, शुभम लोंढे, अथर्व जाधव या मुलांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांना समितीच्या वतीने बक्षीस देण्यात आले.

अजिंक्य मित्र मंडळ, गजानन कॉलनी मित्रमंडळ, बनकर कॉलनी मित्रमंडळ, क्रांति युवा व परिसरातील तरूणांनी हे कार्यक्रम व उपक्रमांचे संयोजन केले.

"गेली तीन वर्षांपासून परिसरातील आम्ही सर्व तरूण एकत्रितपणे शंभू जयंती उत्सव साजरा करीत आहोत. मिरवणुकीत होणारा खर्च छत्रपतिंच्या नावे समाजातील वंचित घटकांचे दु:ख कमी करण्यासाठी वापरण्याचा आमचा अधिकाधिक प्रयत्न आहे.
चारूदत्त वांजळे, कार्यकर्ता, शंभु जयंती जन्मोत्सव समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com