संमेलनाध्यक्षांची भाषणे भेटीला

संमेलनाध्यक्षांची भाषणे भेटीला

पुणे - महाराष्ट्र साहित्य परिषदे (मसाप) तर्फे मागील सतरा वर्षांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या भाषणांचे पुस्तक तयार करण्यात आले आहे. त्यात इंदूर येथे २००१ मध्ये झालेल्या संमेलनापासून ते यावर्षीच्या डोंबविली येथे झालेल्या संमेलनापर्यंतच्या अध्यक्षांची भाषणे समाविष्ट केली आहेत. हे पुस्तक लवकरच उपलब्ध होणार आहे.

विशेषतः या संमेलनांमध्ये घडलेल्या घटना व वादांबाबतचीही माहिती या पुस्तकामध्ये असणार आहे. हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. ‘मसाप’च्या संशोधन विभागप्रमुख व ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मीरा घांडगे यांनी या पुस्तकासाठी संकलन केले आहे.
 

डॉ. आनंद यादव यांचे भाषण संकेतस्थळावर
‘मसाप’च्या पुढाकारामुळे दिवंगत डॉ. आनंद यादव यांचे प्रस्तावित अध्यक्षीय भाषण नऊ वर्षांनी वाचकप्रेमींना उपलब्ध होणार आहे. त्यासाठी डॉ. यादव यांच्या कन्या डॉ. कीर्ती मुळीक यांनी परिषदेला सहकार्य केले. हे भाषण ‘मसाप’च्या www.masapapune.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचेही प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

यांची भाषणे समाविष्ट
डॉ. विजया राजाध्यक्ष (इंदूर- २००१), राजेंद्र बनहट्टी (पुणे- २००२), डॉ. सुभाष भेंडे (कराड- २००३), प्रा. रा. ग. जाधव (औरंगाबाद- २००४), डॉ. केशव मेश्राम (नाशिक- २००५), मारुती चितमपल्ली (सोलापूर- २००६), अरुण साधू (नागपूर- २००७), म. द. हातकणंगलेकर (सांगली- २००८), डॉ. द. भि. कुलकर्णी (पुणे- २०१०), उत्तम कांबळे (ठाणे- २०११), वसंत आबाजी डहाके (चंद्रपूर- २०१२), डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (चिपळूण- २०१३), प्रा. फ. मुं. शिंदे (सासवड- २०१४), डॉ. सदानंद मोरे (घुमान- २०१५), डॉ. श्रीपाल सबनीस (पिंपरी- चिंचवड- २०१६), अक्षयकुमार काळे (डोंबिवली- २०१७).

आगामी पुस्तकात संमेलनाध्यक्षांची संपूर्ण भाषणे, तसेच विषय सूचीही दिली आहे. महाबळेश्‍वर येथे २००९ मध्ये झालेल्या संमेलनाक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. आनंद यादव निवडून आले होते. त्यांचेही प्रस्तावित अध्यक्षीय भाषण या पुस्तकात आहे.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसाप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com