सांगवीतील पद्मभुषण वसंत दादा पाटील पुतळ्याची दुरावस्था

रमेश मोरे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

जुनी सांगवी - जुनी सांगवी दापोडी पवनानदी पुलाच्या समोर सांगवी गावच्या पुर्व प्रवेशद्वारावर महाराष्ट्राच्या राजकारणातील अष्टपैलु नेतृत्व पद्मभुषण वसंतदादा पाटील यांचा पुतळा आहे. मात्र सध्या हा पुतळा आणि त्याच्या आजुबाजुच्या परिसराला बकालपणा आला आहे. 

जुनी सांगवी - जुनी सांगवी दापोडी पवनानदी पुलाच्या समोर सांगवी गावच्या पुर्व प्रवेशद्वारावर महाराष्ट्राच्या राजकारणातील अष्टपैलु नेतृत्व पद्मभुषण वसंतदादा पाटील यांचा पुतळा आहे. मात्र सध्या हा पुतळा आणि त्याच्या आजुबाजुच्या परिसराला बकालपणा आला आहे. 

माथ्यावर ना छत ना सावली ना स्वच्छता 
गेल्या कित्येक दिवसांपासुन पुतळ्याची स्वच्छता झालेली नसल्याने पुतळा धुळीने माखला आहे. याच ठिकाणी त्यांच्याच नावाने वसंतदादा पुतळा बसस्थानक आहे. रोज पुणे व परिसरातील उपनगरात येथुन बसगाड्यांच्या दिवसभरात पन्नास फे-या होतात. प्रमुख स्थानक असलेल्या या थांब्यावरून सांगवीकर प्रवास करतात. मात्र सांगवीकरांचे व प्रशासनाचे वसंतदादा पुतळ्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. दादांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी अभिवादन करणारे काँग्रेसीही अभिवादन व फोटो पुरतेच पुतळ्याकडे फिरकत असल्याने पुतळ्याच्या गळ्यातील वाळलेले पुष्पहार देखील काढलेले नाही. तसेच परिसरातील फुलझाडे तोडल्याने पुतळा परिसराला उजाड बकाल स्वरूप आले आहे.

हा पुतळा तत्कालिन सांगवी पुतळा समितीच्या वतीने महानगर पालिकेस भेट देण्यात आला होता. याचे ता.२३-५-१९८५ रोजी तत्कालिन विधान परिषद अध्यक्ष जयवंतरावजी टिळक, दुग्धविकासमंत्री अनंतरावजी थोपटे, लक्ष्मणशास्री जोशी, अशोक मोहोळ, आदींच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. 

उत्सव कार्यक्रमांवेळी होर्डींग,शुभेच्छा फलकांनी पुतळा झाकला जातो. नेते मंडळीचे वाढदिवस, कार्यक्रम, उत्सव निवडणुकांची पोस्टर बाजी या पुतळ्यांने गेली एक तपापासुन पाहिली आहे. अनेक नेते मोठ मोठे फलक लावुन दादांच्या साक्षीने राजकारणात मोठे झाले. परंतु, आता त्याच पुतळ्याकडे दूर्लक्ष झाले आहे.

दरम्यान, पुतळा व परिसराची नियमित स्वच्छता व्हावी. परिसराचे सुशोभीकरण करावे. अशी सुजाण नागरीकांमधुन मागणी होत आहे.

Web Title: sangvi pune vasantdada patil statue