स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सासवड पालिका देशपातळीवर चमकली

saswad.
saswad.

सासवड (पुणे) - स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेत सासवड नगरपालिकेचा देशपातळीवरील पश्चिम विभागात प्रथम क्रमांक आला आहे. नगरपालिकेला १५ कोटी रुपयांची बक्षिसाची रक्कम राज्य शासनाकडून मिळणार आहे. तर पंतप्रधानांच्या हस्तेही सन्मान होणार आहे.

नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी विनोद जळक व नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी याबाबत ही माहिती दिली. देशातील ४ हजार २०३ नगरपालिकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातून सासवड नगरपालिकेला देशाच्या पश्चिम विभागात नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली ( Innovation And Best Practices ) प्रकारात प्रथम क्रमांकाचा मान मिळाला.

नवी दिल्ली येथे केंद्रीय नगर विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी याची काल सायंकाळी घोषणा केली. या स्पर्धेतून पालिकेला राज्याचे १५ कोटी रुपयांचे बक्षिसाची मिळणार आहे. केंद्राचे बक्षिसही वेगळे मिळेल, असे सांगितले. हे वृत्त समजताच शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. 

पालिका सभागृहातील पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी विनोद जळक म्हणाले; पालिकेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. कचरा वर्गीकरण, संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया यावर शहराने 100 टक्के यशस्वी काम केल्याने हे बक्षीस मिळाल्याचे जळक म्हणाले. यावेळी सत्ताधारी जनमत विकास आघाडीचे प्रमुख व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. कै. चंदुकाका जगताप यांच्या स्मृतिंना हे बक्षिस अभिवादन आहे. पुढील वर्षांतही पालिका स्पर्धेत उतरून पुन्हा काम दाखवेल, असे ते म्हणाले.

नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, आरोग्य सभापती पुष्पा जगताप यांनीही मनोगत मांडले. यावेळी उपनगरध्यक्ष मनोहर जगतापांसह सर्व नगरसेवक, विभागप्रमुख, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. नगरसेवक संजय ग. जगताप यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com