"ससून'मध्ये रुग्ण भेटीसाठी वेळा निश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुणे - निवासी डॉक्‍टरांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून ससून रुग्णालयाच्या सुरक्षेची नवीन रचना केली आहे. त्याअंतर्गत रुग्णाला भेटण्याच्या वेळा निश्‍चित केल्या असून, लहान मुले आणि वृद्धांना रुग्णालयात न आणण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती ससून रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. 

"कामाच्या ठिकाणी सुरक्षा' या मागणीसाठी राज्यातील 14 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील चार हजार पाचशे डॉक्‍टरांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले होते. सुरक्षितता देण्याच्या आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्या पार्श्‍वभूमीवर "ससून' प्रशासनाने बदललेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा "सकाळ'ने घेतला. 

अशी असेल सुरक्षा व्यवस्था 
निवासी डॉक्‍टरांना सुरक्षित वातावरणात रुग्णसेवा करता यावी, यासाठी सुरक्षा व्यवस्थेची रचना बदलली आहे. आतापर्यंत प्रत्येक वॉर्डमध्ये, अतिदक्षता विभागाजवळ सुरक्षारक्षक नियुक्त केले जात होते. पण, आता रुग्णालयात रुग्णांबरोबर येणाऱ्या सर्व नातेवाइकांना रुग्णालयात प्रवेश दिला जात नाही. आपत्कालीन वैद्यकीय विभागात रुग्णासोबत फक्त दोनच नातेवाइकांना सोडण्यास परवानगी मिळत असून, रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णासोबत एकाच नातेवाइकाला प्रवेश देण्यात येत आहे. इतर नातेवाइकांना रुग्णांना भेटण्यासाठी पास देण्याची व्यवस्था केली आहे. त्या आधारावर सकाळी सात ते आठ आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेतच रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाइकांना प्रवेश दिला जात आहे. यासाठी सुरक्षा व्यवस्था प्रवेशद्वारावर नियुक्त केली आहे. रुग्णालयात स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

रुग्णांना भेटण्यासाठी येताना नातेवाइकांनी लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना शक्‍यतो आणू नये. रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टतर्फे दिवसातून तीन वेळा पौष्टिक आहार दिला जातो. त्यामुळे रुग्णासाठी बाहेरील खाद्यपदार्थ आणू नयेत. रुग्णाला भेटायला आलेल्या नातेवाइकांसाठी विश्रांती कक्षही उभारला आहे. 
डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय 

ससून रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या सुरक्षेसाठी सध्या 135 सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. पुढील दोन दिवसांत त्यात 75 सुरक्षारक्षकांची भर पडणार आहे. त्यामुळे निवासी डॉक्‍टरांना रुग्णसेवेसाठी आश्‍वासक वातावरण निर्माण होईल, असा विश्‍वास ससून रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

Web Title: Sassoon hospital patient visits to specific times