सातारा रस्त्यावरील भुयारी मार्ग कुलूपबंद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

बिबवेवाडी - सातारा रस्त्यावरील पर्वती दर्शन येथील पादचारी भुयारी मार्ग कुलूप लावून बंद केला असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, अपघातांना आमंत्रण मिळत आहे. भुयारी मार्ग बंद असल्यामुळे पर्वती दर्शनमधील नागरिकांना बीआरटी मार्गातून जीव धोक्‍यात घालून अथवा स्वारगेट उड्डाण पुलाखालून वळसा मारून यावे लागत आहे. 

बिबवेवाडी - सातारा रस्त्यावरील पर्वती दर्शन येथील पादचारी भुयारी मार्ग कुलूप लावून बंद केला असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, अपघातांना आमंत्रण मिळत आहे. भुयारी मार्ग बंद असल्यामुळे पर्वती दर्शनमधील नागरिकांना बीआरटी मार्गातून जीव धोक्‍यात घालून अथवा स्वारगेट उड्डाण पुलाखालून वळसा मारून यावे लागत आहे. 

भुयारी मार्गात महापालिकेने व्यावसायिक गाळे काढलेले आहेत; परंतु अद्यापपर्यंत त्याची निविदा काढली नसल्यामुळे गाळे अनेक वर्षांपासून तसेच पडून आहेत. भुयारी मार्गाची दुरवस्था झाली असून, वायरिंग तोडून ट्यूब फोडल्या आहेत. मार्गात मोठ्या प्रमाणावर कचरा साठला असून, मद्यपींच्या बाटल्यांचा खच पडला आहे. स्वारगेट उड्डाण पूल झाल्यामुळे होल्गा चौकातून येणारी वाहने भुयारी मार्गाशेजारून जातात. भुयारी मार्गाचे कोणतेही चिन्ह, सिग्नल येथे लावला नसल्यामुळे वाहनचालकांना भुयारी मार्गातून येणाऱ्या पादचाऱ्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होतात. मार्ग बंद केल्यामुळे नागरिकांना बीआरटी मार्गातून जीव धोक्‍यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. भुयारी मार्गात अनेक गैरप्रकार चालत असल्यामुळे महापालिकेने भुयारी मार्ग बंद केला असून, मार्गातील बंद गाळे सुरू करण्यासाठी निवीदा काढण्याची मागणी केल्याचे नगरसेविका मनीषा चोरबोले यांनी सांगीतले, तर भुयारी मार्गातील गाळे सुरू करण्यासाठी निविदांची प्रक्रिया सुरू केल्याचे नगरसेवक अभय छाजेड यांनी सांगितले. 

टॅग्स

पुणे

टाकवे बुद्रुक : कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची ऑनलाईन अर्ज भरायला सायबर कॅफेत रांग लागत आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करायला...

03.57 PM

जुन्नर : शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरताना 'भीक नको पण कुत्रं आवर' असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे कृषीनिष्ठ शेतकरी...

03.36 PM

औंध : औंधरस्ता येथील पडळवस्ती येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत सतरा घरे जळून खाक झाल्याने सर्वच कुटूंबे उघड्यावर पडली आहेत...

12.45 PM