बारामतीत पोलिस असल्याचे सांगून चार लाखांचे दागिने लंपास

शहरातील वर्दळीच्या अशोकनगर परिसरातील घटना
stole jewelery.
stole jewelery.Sakal

बारामती - पोलिस असल्याची बतावणी करुन शहरातील वर्दळीच्या अशोकनगर भागातून एका ज्येष्ठ महिलेचे चार लाखांचे आठ तोळ्यांचे दागिने दोन चोरट्यांनी लंपास केले. मंगळवारी (ता. 21) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास देशपांडे हॉस्पिटलसमोर ही घटना घडली.

अशोकनगरमधील अमृतबाला शोरीलाल आहुजा (वय 74) या संध्याकाळी फिरायला निघाल्या होत्या. देशपांडे हॉस्पिटलसमोर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी आपण पोलिस आहोत, समोर चोरी झाली आहे, तुम्ही तुमचे दागिने रुमालात ठेवा, असे सांगत त्यांच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या व दोन कडी काढून घेतली. हातचलाखीने सोन्याच्या कड्याऐवजी त्यांनी स्टीलची कडी त्या ठिकाणी ठेवून सोन्याची कडी घेऊन पळ काढला.

अमृतबाला घरी आल्यानंतर त्यांना आपल्याला फसविल्याचे लक्षात आले. संध्याकाळी वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीने या परिसरात घबराटीचे वातावरण आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक या परिसरात सकाळी व संध्याकाळी फिरायला जात असतात, या भागात साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com