जुन्नरला माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.मोरे यांची शिक्षक संघटनेबरोबर चर्चा

junnar
junnar

जुन्नर -  माध्यमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाणार असून, शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाची सर्वांगीण गुणवत्ता वाढविण्यासाठी परिश्रम घ्यावेत असे आवाहन माध्यमिक जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी येथे केले. 

जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष केरभाऊ ढोमसे,  मुख्याध्यापक संघाचे टी. बी. वाघदरे, शिक्षक नेते भास्करराव पानसरे, मुख्याध्यापक मारुती ढोबळे, पंकज घोलप, संतोष ढोबळे, निलेश काशीद तसेच शिक्षक व संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

डॉ.मोरे म्हणाले, जिल्ह्यात माध्यमिक विभागात एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही याबाबत शिक्षकांनी योग्य उपाययोजना कराव्यात. स्पर्धात्मक युगात विद्यार्थी टिकण्यासाठी  ‎गुणवत्तापूर्वक ,दर्जेदार व उपयोजनात्मक  शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संघटनांना विश्वासात घेऊन कार्यवाही केली जाईल. 

यावेळी जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष केरभाऊ ढोमसे यांनी शिक्षकांच्या समस्या मांडल्या. त्या सोडवण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करण्याची मागणी केली. जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने यावेळी डॉ. मोरे यांचा सन्मान करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com