भाजपची स्वबळाची तयारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

पुणे - युतीची शक्‍यता मावळत असल्याचे दिसून आल्यामुळे भाजपने स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पक्षाचे नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक झाली. यात पक्षाच्या प्रभागनिहाय स्थितीचा आढावा घेण्यात आला. या संदर्भात बुधवारी पुन्हा बैठक होणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्यासंदर्भात भाजपची चर्चा सुरू आहे. मात्र, युती करावी की नाही, याबाबत पक्षात मतभेद आहेत. पुण्यात एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले असताना त्यांनी "युतीची तयारी ठेवा', अशा सूचना नेत्यांना दिल्या होत्या; परंतु शहर पातळीवर युतीबाबत दोन्ही पक्षांकडून कोणत्याही हालचाली सुरू नसल्याने युती होणार की नाही, याबाबत पक्षाच्या इच्छुकांमध्ये संभ्रम आहे.

असे असताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह आठही आमदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बाणेर येथील एका हॉटेलमध्ये आज दुपारी सुमारे सहा तास बैठक सुरू होती. शुक्रवारपासून (ता. 27) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार आहे. युती झाली नाही तर अडचण निर्माण होऊ शकते, हे विचारात घेऊन या बैठकीत पक्षाचा प्रभागनिहाय आढावा घेण्यात आला. इच्छुक कोण आहेत, एकाच प्रभागात पक्षाकडून इच्छुकांची संख्या किती आहे, आयात उमेदवारांची परिस्थिती काय आहे, नेमके कुठे कमी पडतो आहोत, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

Web Title: Self power for BJP